Pages

Monday 12 December 2011

घाटंजी न.प.निवडणुकीत संमिश्र निकाल

कॉंग्रेसला आघाडी पण बहुमत नाही
रा.कॉ.५ तर सेना ४ जागी विजयी
सेनेमुळे भाजपाला भोपळा


नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज जाहिर झालेल्या निकालात कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सर्वच राजकीय पक्षांची कोंडी झाली असुन निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादीची असलेली 'हवा' निकालातुन न दिसल्याने राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहे. मात्र कॉंग्रेसलाही केवळ एका जागे अभावी सत्तेपासुन दुर रहावे लागणार आहे.
नगर परिषद निवडणुकीच्या निकालात कॉंग्रेसला ८, राष्ट्रवादी कॉंग्रेसला ५ व शिवसेना भाजपाच्या कथित महायुतीला ४ जागी विजय मिळाला. तर यापुर्वी ६ नगरसेवक असलेल्या भाजपाला एकाही जागी विजय मिळवता आला नाही. शिवसेनेशी झालेल्या युतीमुळे भाजपाला हा फटका बसला असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. वर्तमान नगरसेवकांना नागरिकांच्या संतापाचा फटका बसला असुन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा विद्यमान नगरसेवक शैलेष ठाकुर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच विद्यमान नगरसेवक दादाराव खोब्रागडे हे देखिल पराभुत झाले. केवळ संगिता भुरे या एकमेव नगरसेविकेला जनतेने पुन्हा संधी दिली. दिग्गजांमध्ये माजी नगराध्यक्ष जगदिश पंजाबी विजयी झाले तर माजी नगराध्यक्ष शाम बेलोरकर,दुर्गा साखरकर, माया मंगाम यांचा पराभव झाला.
जलाराम प्रभाग क्र. १ (अ) मध्ये कॉंग्रेसचे संदिप बिबेकार (१०४७ मते) यानी रा.कॉ.च्या प्रशांत भोरे (६४४ मते), सेनेचे संजय बुल्ले (६४४ मते), अपक्ष दत्ता गटलेवार (९४ मते) व संजय राऊत (२५ मते) यांचा पराभव केला. ब गटात रा.कॉ.च्या संगिता भुरे (१११७ मते) यांनी कॉंग्रेसच्या स्वाती महाजन (७८१ मते), सेनेच्या सुलभा खांडरे (६७९ मते) यांना पराभुत केले. क गटामध्ये शिवसेनेच्या सरोज पडलवार (९९४ मते) यांनी आघाडी घेत  कॉंग्रेसच्या रेखा दोनाडकर (८०५ मते) व रा.कॉ.च्या वच्छला तलमले (७७९ मते) यांचा पराभव केला. ड गटात झालेल्या काट्याच्या लढतीत कॉंग्रेसच्या परेश कारीया (९९१मते) यांनी सेनेचे प्रमुख उमेदवार शैलेष ठाकुर (९३२ मते), रा.कॉ.चे शाम बेलोरकर (६२१ मते) यांना धुळ चारली.
घाटी क्र. २ मध्ये अ गटात सेनेचे संतोष शेंद्रे (७४५ मते) यांनी रा.कॉ.च्या दादाराव खोब्रागडे (५६१ मते), भाजपाचे विजय कासार (३८१ मते), कॉंग्रेसचे मधुकर पेटेवार (५९४ मते), अपक्ष नरेश कुंटलवार (३५६ मते), अजय गजभिये (९२ मते) यांना पराभुत केले. ब गटामध्ये शिवसेनेचे दिनेश उईके (७८६ मते) यांनी कॉंग्रेसच्या सतिष तोडसाम (७१५ मते), राष्ट्रवादीचे संतोष गेडाम (५३१ मते), भाजपाचे श्रावण परचाके (२९० मते), अपक्ष आनंद मडावी (४०१ मते) यांना पराभुत केले. क गटात कॉंग्रेसच्या अर्चना गोडे (८४७ मते) यांनी सेनेच्या सिता गिनगुले (७८२ मते), रा.कॉ.च्या सुधा ठाकरे (४३८ मते), भाजपाच्या दुर्गा साखरकर (३२२ मते), अपक्ष किशोरी चौधरी (३७५ मते) यांचा पराभव केला. ड गटात कॉंग्रेसच्या सिमा डंभारे (९०१ मते) यांनी शिवसेनेच्या सोफिया सैय्यद फिरोज (६८२ मते), रा.कॉ.च्या पुजा दिकुंडवार (४७४ मते), भाजपाच्या नलु मोहिजे (२९८ मते) अपक्ष फरझाना परविन अ रशिद (३४२ मते), विजु राठोड (६४ मते) यांचा दणदणीत पराभव केला. तर इ गटामध्ये सेनेच्या शर्मिला उदार (८५९ मते) यांनी रा.कॉ.च्या सिंधु सिरपुरे (७२० मते), कॉंग्रेसच्या जैबुनबी अफजलखॉ पठाण भाजपाच्या सुनिता गवारकर (३१७ मते), अपक्ष वर्षा जाधव (३५७ मते) व माया मंगाम (१७० मते)यांचा पराभव केला.
राममंदिर प्रभाग क्र.३ मध्ये चारही जागांवर कॉंग्रेसने बाजी मारली. येथे अ गटात कॉंग्रेसच्या शोभा ठाकरे (१४६९ मते) यांनी रा.कॉ च्या सारीका उगले (७७५ मते), सेनेच्या सुलभा खांडरे (२६४ मते) यांचा पराभव केला. ब गटात कॉंग्रेसच्या जयश्री दिडशे (धांदे) (१०८३ मते) यांनी रा.कॉ.च्या निर्मला पांडे (५३१ मते), भाजपाच्या ललिता ठाकुर (३९१ मते) यांचा पराभव केला. क गटात कॉंग्रेसच्या जगदिश पंजाबी (१२७७ मते) यांनी रा.कॉ.च्या प्रमोद गिरी (७७५ मते), भाजपाचे विनायक परचाके (१६३ मते), मनसेचे गजानन भालेकर (३०४) यांचा पराभव केला. ड गटात कॉंग्रेसच्या किशोर दावडा (१४८६) यांनी रा.कॉ.च्या अशोक कटकमवार (५७९ मते), अपक्ष रविंद्र ठाकरे (२४५ मते) यांना पराभुत केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रभाग क्र. ४ मध्ये राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला. येथे अ गटात रा.कॉ.च्या चंद्ररेखा रामटेके (१०५६ मते) यांनी कॉंग्रेसच्या भारती चुनारकर ( ६९१ मते), भाजपाच्या शोभा रामटेके (४०१ मते), अपक्ष चित्रकला देवतळे (१३५ मते) यांना पराभुत केले. ब गटात  रा.कॉ.च्या इंदु परतेकी (१०७५ मते) यांनी कॉंग्रेसच्या शालु गेडाम (७३४ मते), भाजपाच्या नंदा कोडापे (४६७ मते) यांचा पराभव केला. क गटामध्ये राष्ट्रवादीचे राम खांडरे (१३९७ मते) यांनी कॉंग्रेसच्या नरेंद्र धनरे (४४० मते), भाजपाचे स्वरूप नव्हाते (४४६ मते) यांचा दणदणीत पराभव केला. ड गटात रा.कॉ.चे अकबर तंव्वर (९०७ मते) यांनी कॉंग्रेसचे सैय्यद मोहिब सैय्यद लतिफ (४३१ मते), अपक्ष मधुकर निस्ताने (३७१ मते), भाजपाचे अरविंद बोरकर (४१० मते), अपक्ष सुधिर अग्रहरी (१०४ मते), मनसेचे सुधिर उरकुडे (३९ मते), प्रभा शेवरे (२८ मते) यांचा पराभव केला. घाटंजीकरांनी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न दिल्याने सत्तेत नेमके कोण येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

'धनुष्य' आला पण 'बाण' गेला

































अडीच वर्ष नगराध्यक्षपद सेनेकडे असतांना मनमानी कारभाराचा फटका शिवसेनेच्या शैलेष ठाकुर यांना बसला. प्रचारादरम्यानही जनतेने त्यांना अनेकदा फटकारले. यापुर्वी सेनेकडे तिन नगरसेवक होते. यावेळी एका जागेची बढत मिळाली असली तरी प्रमुख उमेदवारालाच पराभवाचे तोंड पहावे लागल्याने धनुष्य आला पण बाण गेला अशी परिस्थिती झाली आहे.
निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने नागरीक सांस्कृतीक भवनाबाहेर जमले होते.

No comments:

Post a Comment