ना.मोघेंच्या जनता दरबाराचा बोजवारा
कथितपणे प्रशासनाच्या चुकीमुळे घरकुलापासून वंचीत राहिलेल्या लाभाथ्र्यांसाठी सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. आता आपल्याला घरकुल मिळणार या भाबड्या आशेने सुमारे दोन हजार ग्रामस्थ आपली रोजमजुरी बुडवून येथिल सांस्कृतीक भवनात जमले होते. ना.मोघे आपल्या समस्या ऐकुन घेणार व तडकाफडकी कार्यक्रमातच जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिका-यांना सुचना देणार अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र कार्यक्रम पत्रिकेतील एकही प्रमुख मान्यवर उपस्थित न राहिल्याने जनता दरबाराचा पार बोजवारा उडाला. यावेळी आलेल्या ग्रामस्थांकडून घरकुलासाठी साधे घेण्यात आले.मात्र कोणाचीही समस्या ऐकुन घेण्यात आली नाही. अनेकांना गर्दीमुळे अर्ज देता आले नाही अशांनी ग्रामसभेत अर्ज द्यावेत अशी सुचना देण्यात आली. यापलीकडे या जनता दरबारात ठोस असे काही झाले नाही. पंचायत समिती सदस्य सहदेव राठोड यांनी कालच पत्रपरिषद घेऊन या जनता दरबाराचा निषेध नोंदविला होता हे विशेष. खेड्यापाड्यातुन अनेक नागरिक आपली कामे सोडून आले होते. मात्र जनता दरबाराने निराशा केल्याने ग्रामस्थांनी याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली. केवळ निवडणुकीच्या तोंडावर आपल्या प्रसिद्धीसाठी प्रशासकीय यंत्रणेला वेठीस धरून आयोजीत केलेल्या जनता दरबाराचा म.न.से.चे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे व पंचायत समिती सदस्य डॉ. विजय कडू यांनी निषेध नोंदविला आहे.
झटाळा येथे शेतीच्या वादातून भावाचा खुन
शेतीच्या वादातून तालुक्यातील झटाळा येथे लहान भावाने मोठ्या भावाचा बैलगाडीच्या उभारीने मारहाण करून निर्घुण खुन केल्याची घटना काल (दि.३०) ला रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. आरोपी अशोक पुनाजी आत्राम (२८) याने त्याचा मोठा भाऊ मारोती पुनाजी आत्राम (३५) याचेशी शेतीच्या विषयावरून वाद घालुन भांडण केले. वाद विकोपाला गेल्याने त्याने बैलगाडीच्या उभारीने भावास बेदम मारहाण केली. यात मारोती याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पारवा पोलीसांनी आरोपीविरूद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असुन आरोपी अद्याप फरार आहे.
साभार:- देशोन्नती
No comments:
Post a Comment