Pages

Tuesday 6 December 2011

निवडून येण्यापुर्वीच तिन अपक्ष उमेदवारांचा ‘राजीनामा’

निवडणुकीच्या प्रचारात आपल्याबद्दल मतदारांना विश्वास वाटावा याकरीता जो तो आपापल्या पद्धतीने प्रयत्न करीत असताना घाटंजीत तिन अपक्ष उमेदवारांनी शंभर रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर आपला राजीनामाच मतदारांच्या हाती सोपविला आहे. दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न केल्यास अथवा कोणताही गैरप्रकार सप्रमाण सिद्ध झाल्यास मतदार या राजीनामा पत्राद्वारे आपल्याला परत बोलावू शकतात असे प्रतिज्ञापत्रच या तिन उमेदवारांनी तयार केले आहे. प्राऊटिस्ट ब्लॉक समर्थित अपक्ष उमेदवार मधुकर निस्ताने (प्रभाग क्र. ४ ड), संतोष गवळी (प्रभाग क्र. ३ क) आणी अजय गजभिये (प्रभाग क्र.२अ) यांनी असा राजीनामा तयार केल्याने त्याची चर्चा सुरू आहे. अण्णा हजारेनी सांगीतलेल्या  ‘राईट टु रिकॉल’  पासुन प्रेरणा घेऊन हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगीतले. प्रत्येक उमेदवार निवडणुकीत आश्वासने देतो. मात्र त्याची पुर्तता कधीच होत नाही. त्यामुळे अशा उमेदवारांना धडा शिकविण्यासाठी मतदारांजवळ कोणताही पर्याय नसतो. भ्रष्टाचाराची प्रकरणे सोयीस्करपणे दाबल्या जातात. रस्ते नाल्या व विकासासाठी आलेला निधी नगरसेवकांच्याच विकासात खर्च होतो. गैरप्रकार होत असल्याचे स्पष्ट दिसत असुनही नागरीक काहीच करू शकत नाही. त्यामुळेच मतदारांना निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची जाणीव रहावी आणी ज्यांनी आपल्या मतांच्या माध्यमातुन विश्वास दाखविला त्यांच्या हातातच लगाम राहावी याकरीताच निवडुन येण्यापुर्वी राजीनामा जनतेच्या हातात सोपविल्याचे या उमेदवारांचे म्हणने आहे. या राजीनाम्याच्या साक्षांकीत प्रतीच मतदारांना दिल्या जात असल्याने हा चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे.
साभार:- देशोन्नती

No comments:

Post a Comment