Pages

Tuesday, 11 September 2012

आंतरराष्ट्रीय कार डिझाईन स्पर्धेत घाटंजीचा साकेत नामपेल्लीवार द्वितीय


 


 डि.वाय.पी.डी.सी. सेंटर फॉर ऑटोमोटीव्ह रिसर्च ॅन्ड स्टडिज द्वारा आयोजीतडि.वाय.पी.डी.सी. डिझाईन कॉंटेस्ट २०१२मध्ये घाटंजी येथिल साकेत विष्णु नामपेल्लीवार याने द्वितीय क्रमांक पटकावला.
साकेत हा सध्या गांधीनगर (गुजरात) येथे नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डिझाईन्स मध्ये ट्रान्सपोर्टेशन ॅन्ड ऑटोमोबाईल डिझाईन्स मध्ये शिक्षण घेत आहेअतिशय प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत देशविदेशातील सुमारे १५०० डिझायनर्सनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक बेसिक्टस (टर्की) येथिल कॅघन एंजीन, द्वितीय साकेत नामपेल्लीवार,गांधीनगर गुजरात, तर तृतिय क्रमांक सायमॉन वेल्स, टेक्सास (अमेरीका) यांनी पटकावला. ‘ कार फॉर बॉन्ड गर्लया थिम वर आधारीत कारची डिझाईन साकेत ने तयार केली आहे. या कारलाशेल्बी कोब्रा रिवायव्हलहे नाव देण्यात आले आहे.
या ऑनलाईन स्पर्धेत इंटरनेटवर सर्वाधीक मते मिळालेल्या ५० डिझाईन्सला परिक्षकांकडे पाठविण्यात आले. त्यातून तिन सर्वोत्कृष्ट डिझाईन्सला निवडण्यात आले. या स्पर्धेचे परिक्षण लंडन येथिल सुप्रसिद्ध कार डिझायनर इमॅन्युअल निकोसिया, चिन मधील डिझायनर योंगचॉल चॉन, तसेच भारतातील आघाडीचे ऑटोमोबाईल डिझायनर अभिजीत भोगे यांनी केले. साकेत हा समर्थ विद्यालयातील शिक्षक विष्णु नामपेल्लीवार यांचा मुलगा आहे. आंतरराष्ट्रीय पातळीच्या स्पर्धेतील यशाबद्दल साकेतचे सर्वत्र कौतुक होत आहे.
साभार :- देशोन्नती  




No comments:

Post a Comment