Pages

Wednesday 12 September 2012

घाटंजी नगर परिषदेत मनसेचा राडा

मुख्याधिका-याला धक्काबुक्की








विनापरवाना बांधकामे, शहरातील समस्या तसेच मुख्याधिका-याची मनमानी याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  कार्यकर्त्यांनी  घाटंजी नगर परिषद कार्यालयात गोंधळ घातला. मुख्याधिका-याच्या कक्षातील साहित्याची तोडफोड करून मुख्याधिका-याला धक्काबुक्की केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, समर्थ कर्णबधीर विद्यालयाचे अवैध बांधकाम याविषयी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यानी गेल्या काही  महिन्यांपासुन तक्रारी केल्या होत्या. मात्र मुख्याधिका-यानी त्यावर कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकत्र्यानी ..कार्यालयात धुडगूस घातला. मुख्याधिकारी केवळ टोलवाटोलवीची उत्तरे देतात हा त्यांचा आरोप होता. कार्यालयातील संगणके, टेबल खुच्र्या आदींची तोडफोड करून  कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. तोडफोड केल्यावर मुख्याधिका-यांच्या कक्षाला चपलांचा हार घालण्यात आला अचानक झालेल्या प्रकाराने कार्यालय परिसरात खळबळ उडाली होती. या गोंधळात नगर परिषदेचे सुमारे लाखांचे नुकसान झाल्याचे मुख्याधिका-यानी सांगितले.


मुख्याधिका-यांचा हेकेखोरपणाच कारणीभुत - नगराध्यक्ष
 आज झालेली घटना घाटंजी नगर परिषदेच्या ईतिहासात प्रथमच घडली असुन ती अत्यंत दुदैवी आहे. मात्र या संतापाला मुख्याधिका-यांचा हेकेखोरपणा असहकार्याची कार्यपद्धतच जबाबदार असल्याची प्रतिक्रीया नगराध्यक्ष जगदीश पंजाबी यांनी व्यक्त केली.

कार्यकर्ते काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते - मुख्याधिकारी
मनसेच्या कार्यकत्र्यांनी दिलेल्या तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे. त्यांना हीच गोष्ट समजावुन सांगण्याचा प्रयत्न करीत होतो. मात्र कार्यकर्ते काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तोडफोड करण्याचाच त्यांचा हेतु होता अशी प्रतिक्रीया मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे यांनी दिली. पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने समस्या सोडविण्यास कमी पडत असल्याचे त्यांनी सांगितले.

सत्ताधारी मुख्याधिका-यात समन्वय नाही - गटनेता
सत्ताधारी मुख्याधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने विकास खुंटला असुन त्यामुळेच नगर परिषदेत धिंगाणा झाल्याची प्रतिक्रीया विरोधी पक्षाचे गटनेते संतोष शेंद्रे यांनी दिली. कोणालाच जनतेच्या समस्यांशी घेणेदेणे नसुन सर्व आपल्याच कामात मग्न असल्याचे ते म्हणाले

साभार :- देशोन्नती  

मनसेने घाटंजी नगर परिषदेत केलेल्या तोडफोडीचा Video

No comments:

Post a Comment