Pages

Monday, 10 September 2012

गिलानी महाविद्यालयाच्या छात्रसंघ सचिवपदी गौरव गावंडे


येथिल शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या आज झालेल्या छात्रसंघ सचिवपदाच्या निवडणुकीत गौरव श्यामकांत गावंडे विजयी झाला.  त्याने प्रतिस्पर्धी पुजा मुन हिचा एका मताने पराभव केला. गौरव गावंडे याला ६ तर पुजा मुन हिला ५ मते मिळाली. गौरव हा गिलानी महाविद्यालयात वाणिज्य शाखा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. या निवडणुकीत एकुण १३ मतांपैकी ११ वर्गप्रतिनिधींनी मतदान केले. निवडणूक झाल्यावर संपुर्ण शहरातून विजयी निवडणुक काढण्यात आली. या निवडणुकीसाठी प्राचार्य डॉ. एम. ए. शहेजाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.बि.बि.चोपडे, प्रा.सि.पी.वानखडे, प्रा.ए.पी.भगत, प्रा.आर.एम.पवार, प्रा.व्ही.एस.जगताप  यांनी काम पाहिले.
साभार :- देशोन्नती  


No comments:

Post a Comment