Pages

Saturday 1 September 2012

विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक दृष्टीने कार्य करावे - प्राचार्य डॉ.शहेजाद

गिलानी महाविद्यालयात जीवशास्त्र मंडळाची स्थापना

महाविद्यालयीन जीवनात प्रत्येक विद्यार्थ्यांने संशोधनात्मक व सकारात्मक दृष्टीने कार्य करून वाटचाल करावी असे प्रतिपादन गिलानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.ए.शहेजाद यांनी केले.
महाविद्यालयातील जीवशास्त्र मंडळाच्या स्थापना कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा.डॉ.आर.एस.विराणी यांचे हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा.सी.पी.वानखडे, प्रा.ए.के.पत्की, प्रा.डॉ.सी.आर.कासार, प्रा.डॉ.एन.एस.धारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयातील प्राणीशास्त्र व वनस्पतीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने सत्र २०१२-१३ करीता जीवशास्त्र मंडळाची स्थापना करून नविन कार्यकारीणी गठित करण्यात आली.
जीवशास्त्र मंडळाच्या अध्यक्षस्थानी राणी भोयर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. घाटंजीलगत असलेल्या टिपेश्वर अभयारण्याच्या परिसिमेवरिल जैवविवीधता तसेच प्राणी व वनस्पतींच्या लुप्त होणा-या प्रजाती यांचे संरक्षण करण्याची गरज आपल्या उद्घाटकीय भाषणात प्रा.डॉ.विराणी यांनी प्रतिपादीत केली. ग्रामिण भागात प्रामुख्याने घोरपडीची मोठ्या प्रमाणात कत्तल होते. अशा दुर्मीळ होत असलेल्या प्रजातींची कत्तल थांबविणे तसेच वृक्षसंवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. दुर्मीळ प्राणी व वनस्पतींचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले. 
नविन युगातल्या माणसांनी संशोधनात्मक कार्यातून आपली जीवनशैली बदलुन पार्यावरण सकस करण्यास करण्यास मदत करावी असे आवाहन प्रा.सी.पी.वानखडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राखी लोखंडे तर आभार प्रदर्शन अतुल राठोड यांनी केले. या कार्यक्रमाला प्रा.आर.जी.डंभारे, प्रा.यु.ए.ठाकरे, प्रा.व्ही.एस.जगताप, प्रा.आर.व्ही.राठोड, प्रा.टी.एम.कोटक, प्रा.एम.एच.ढाले, प्रा.डॉ.पी.आर.राऊत, प्रा.जी.सी.भगत, प्रा.बी.बी.चोपडे, प्रा.आर.एम.पवार, प्रा.जे.पी.मोरे, प्रा.डॉ.एन.एन.तीरमनवार, प्रा.के.आर.किर्दक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता रूचिता अवचित, विजयश्री मनवर, अंकीता पिंपळकर, कल्याणी कुंभारे, सोनल सरवैय्या, अमीत पडलवार, अशोक कुमरे, शंतनु धाबे, सुभाश कन्नारे, विलास करपे, बी.एस.फुटाणे आनंदा कोडग, योगेश व्यवहारे, सुहास दिकुंडवार, प्रविण दोनाडकर यांनी परिश्रम घेतले.

साभार :- देशोन्नती  

No comments:

Post a Comment