अमरावती येथिल विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयात कार्यरत असलेले घाटंजीतील प्रा.विशाल वामनराव बाणेवार यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने रसायनशास्त्र विषयात आचार्य पदवी देऊन सन्मानीत केले आहे.
विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.ए.आर.राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंथेसीस कॅरेक्ट्राझीशन अॅन्ड फिजो केमीकल प्रॉपर्टीज ऑफ सम हेक्ट्रॉ सीकल कंपाऊंड्स अॅन्ड देअर कॉम्प्लेक्शन बिहेविअर या विषयातील प्रबंध विद्यापीठाला सादर केला होता.
यापुर्वी त्यांनी नेट सेट परिक्षा सुद्धा उत्तीर्ण केल्या आहेत. ते आपल्या यशाचे श्रेय आईवडील व मार्गदर्शक प्राध्यापकांना देतात.
भाजयुमो तर्फे भारतमाता व शहीद स्मारकाचे पुजन
भारतीय जनता युवा मोर्चा तालुका घाटंजी च्या वतीने स्वातंत्र्यदिनी अंजी (नृ.) येथे शहिद गुलाबराव रणदिवे यांच्या स्मारकाचे व भारतमातेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी भाजयुमो जिल्हा सचिव स्वप्नील मंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी तालुकाध्यक्ष राजु शुक्ला, तालुका उपाध्यक्ष प्रणव वाघ, तालुका सरचिटणीस गणेश चव्हाण, गजानन पारधी, स्वप्नील भोयर, गोलु रणदिवे, राहुल अंजीकर, पवन वाघ, अमर पडगीलवार, विनय वाघ, गणेश वाघ, आकाश इंगोले, विनोद मंगळे, अमोल तिजारे, विवेक कदम, पांडुरंग डंभारे, विलास जमदापुरे, राहुल जांभुळे, धनंजय रणदिवे, आर्या शुक्ला, संजय मंगळे उपस्थित होते.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment