पोलीस स्टेशन पासुन हाकेच्या अंतरावर बिनधास्तपणे सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक एस.पी.पवार यांच्या पथकाने काल (दि.१६) ला दुपारी ३.२० वाजता छापा मारला. महाराष्ट्र बँकेसमोर असलेल्या मोकळ्या जागेत खुले आमपणे हा मटका अड्डा सुरू होता. या धाडीत राजेंद्र रामदयाळ अग्रहरी, सुरेश रामभाऊ हटवार, मोहन बापुराव शिवणकर, प्रशांत लक्ष्मण धोटे रा.घाटंजी या आरोपींना पोलीसांनी अटक केली. त्यांचे जवळून वरळी मटक्याचे साहित्य व ७ हजार ७५० रू.रोख जप्त करण्यात आली.
हा छापा दुपाराच्या सुमारास टाकण्यात आला. यावेळी अशा अड्ड्यावर हजारो रूपये जमा असतात. मात्र पोलीसांच्या या छाप्यात केवळ साडेसात हजारच रूपये कसे जप्त झाले याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
घाटंजी येथे वर्दळीच्या परिसरात व पोलीस स्टेशनच्या आजुबाजूला खुले आमपणे मटका अड्डे सुरू असतात. घाटंजी पोलीस मात्र त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असतात. या धाडीमुळे घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment