तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा पार्डी (कालेश्वर) ने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात भाग घेऊन विभागीय पातळीवरचा सानेगुरूजी स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे या शाळेची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी दुस-यांदा पात्र ठरली आहे. महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०१०-११ अंतर्गत पार्डी (कालेश्वर) जि.प.शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायत कार्यालयाची तपासणी पथकामार्फत करण्यात आली होती. या तपासणी पथकामध्ये राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष माधव पाटील शेळगावकर, मंत्रालयातील उपसचीव नितिन व्हटकर, पत्रकार महेश पवार, विजय झिंगाडे यांचा समावेश होता.
यावेळी पंचायत समितीतर्फे समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. शाळा अहवाल, ग्रामपंचायत अहवाल, अंगणवाडी केंद्र अहवाल याचे वाचन मुख्याध्यापक गणेश गाऊत्रे, ग्रामसेवक जी. एन.विरदंडे, पुष्पा ठाकरे यांनी वाचन केले.
याप्रसंगी जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी खंदारे, सभापती शैलेश र्इंगोले, गटविकास अधिकारी रामचंद्र गेडाम, विस्तार अधिकारी योगेश उडाखे, रूपेश कल्यमवार, राजु निकोडे, केंद्रप्रमुख दारवनकर, सरपंच विठ्ठल परचाके, संजय मरापे यांची उपस्थिती होती.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment