Pages

Saturday, 11 August 2012

घाटंजी येथे मो.रफी यांना श्रद्धांजली


येथिल अलंकार म्युझिकोतर्फे आयोजीत ’एक शाम रफी के नाम’ या कार्यक्रमातून मो.रफी यांच्या पुण्यतिथी निमित्य भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जलाराम मंदीराच्या सभागृहात हा संगितमय कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी अलंकार म्युझिकोच्या कलाकारांनी मो.रफी यांची विवीध गिते सादर करून श्रोत्याना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी दिवंगत राजेश खन्ना, शम्मी कपुर, देव आनंद, याना श्रद्धांजली अर्पीत करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल तिडके, सैय्यद मुत्तालीक, आकाश कवासे, उमेश ढोके, संदिप बिजेवार, सुर्यकांत ढोके, दिलीप हेमके, रवि शेंडे, जितेंद्र जुनघरे, सिमा ढोके यांनी परिश्रम घेतले.


गांधर्व महाविद्यालयाच्या परिक्षेत घाटंजीतील विद्यार्थ्यांचे सुयश

नुकत्याच झालेल्या अ.भा.गांधर्व महाविद्यालय मुंबई द्वारा घेण्यात आलेल्या परिक्षेत येथिल तालनिनाद / स्वरधारा संगित क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या परिक्षेत प्रारंभिक ते मध्यमापुर्ण पर्यंत विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. प्रारंभिक परिक्षेत तबलावादन या विषयात विजयकांत जैस्वाल, राजेंद्र गोबाडे, मनोज कुंभारे, प्रेमदास भोसले, समिर सुरावार, संज्योत खरतडे, तेजस राठोड, गौरव कनाके, पवन राठोड या विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले. तसेच प्रवेशीका प्रथम मध्ये जय पोटपेल्लीवार, प्रणय हामंद, प्रशांत तुर्केले, राजकुमार पांडे, कौस्तुभ आगे, प्रवेशीका पुर्ण मध्ये प्रतीक ताटेवार, नवनित ढोणे यांनी यश प्राप्त केले. हार्मोनियम या विषयात प्रारंभिक परिक्षेत अनंता भोयर यांनी विशेष योग्यता प्राप्त केली. तसेच ओमप्रकाश कुपटेकर, जयंत दिकोंडवार यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. या सर्व विद्यार्थ्यांना रवि शेंडे व विनोद ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment