तालुक्यातील जि.प.उच्च प्राथमिक शाळा ससाणी येथिल विद्यार्थ्यांनी पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी रॅलीचे आयोजन केले होते. या चिमुकल्यांनी संपुर्ण गावातून मदतनिधी गोळा केला. तालुक्यातील अनेक गावांमध्ये अडाण नदीच्या पुरामुळे अक्षरश: थैमान घातले. यामध्ये अनेक जण बेघर झाले. अनेकांचे सर्वस्व पुरात वाहुन गेले. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी या शाळेतील चिमुकल्यांनीही आपला खारीचा वाटा उचलुन एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे. शाळेचे शिक्षक गुलाब शिसले यानी पुरात सर्वाधीक नुकसान झालेल्या कोळी या गावाची भयावह स्थिती उपस्थितांसमोर कथन केली. त्यानंतर संपुर्ण गावातून मदत फेरी काढण्यात आली. सुमारे एका तासात ससाणी या छोट्याशा गावातून ३ हजार रूपयांची मदत गोळा झाली. हा उपक्रम छोटासा असला तरी समाजमन जर जागृत झाले तर मोठ्या नैसर्गीक आपत्तीवर सुद्धा मात करता येते हे या चिमुकल्यांनी दाखवुन दिले. शालेय विद्यार्थ्यांच्या या रॅलीसोबत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश राठोड, उपसरपंच झोलबाजी लेनगुरे, मुख्याध्यापक विलास डोमाळे, शिक्षक आर.डी.गायकवाड, गुलाब शिसले, राहुल गोलाईत, रूपेश बेलसरे, भुपेंद्र गोहणे, शंकर सालवटकर, जयकुमार सोनडवले सहभागी झाले होते. गटविकास अधिकारी रामचंद्र गेडाम यांनी निधी स्विकारून विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment