सत्ता सांभाळतांना संयम महत्वाचा असतो. मात्र गेल्या काळात तालुक्यातील राजकारणात काही कथित नेत्यांना सत्तेचा उन्माद चढला आहे. माझ्यापेक्षा मोठा कोणीच नाही असा तोरा मिरवित माणूसकीला पायदळी तुडवून निघालेल्या राजकीय धेंडांना धडा शिकविण्यासाठीच निवडणुकीच्या रिंगणात उतरलो अशी प्रतिक्रीया लोकनेते सुरेश लोणकर यांनी दिली. शिवणी जिल्हा परिषद सर्कल व गणातील मतदार बेबंदशाहीला नाकारून राष्ट्रवादीला संधी देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवणी गटात राष्ट्रवादीला बंडखोरीचा सामना करावा लागला असला तरी त्याचा परिणाम जाणवणार नसल्याचे त्यांनी प्रकर्षाने सांगितले. बंजारा समाजाचा नेता समजणा-याला सद्यस्थितीत हाच समाज नाकारत असल्याचे चित्र प्रचारादरम्यान दिसल्याचेही ते म्हणाले. शिवणी गटात सध्या अटीतटीचा सामना सुरू असुन राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, सेना, मनसे व भाजपाचे उमेदवार आपापल्यापरिने प्रचार करीत आहेत. या गटात एकापेक्षा एक उमेदवार उभे ठाकले असल्याने कौल नेमका कोणाला भेटणार यावर सर्वांचेच लक्ष आहे. लोकनेते असे बिरूद लावणा-या सुरेश लोणकर यांना स्वत:ची ओळख देण्याची गरज नसल्याने ईतर उमेदवारांपेक्षा त्यांचे वेगळेपण दिसत आहे. सध्या तालुक्यातील पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ यासह सहकार क्षेत्रावर त्यांची चांगली पकड असल्याने त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत होईल असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. जिल्हा परिषदेतील अभ्यासू व्यक्तीमत्व अशी त्यांची ख्याती आहे. घाटंजी तालुक्यातील राजकारणात बाबु व अण्णा यांच्या जोडीने राजकीय समिकरणे बदलली आहेत. यावेळी अण्णासाहेब पारवेकर व सुरेश लोणकर हे एका बाजूने असल्याने गठ्ठा मते निकालाची दिशा बदलू शकतात. त्यामुळे शिवणी गटात सुरेश लोणकर यांना जनतेचा पाठींबा मिळणार असा कयास लावल्या जात आहे. शिवणी गटात बंजारा तांड्यावर अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी आपला संताप कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रचार फलकावर काढल्याचे चित्र अनेक ठिकाणी नजरेस पडले. नागरिकांनी होर्डींग फाडुन आपला राग व्यक्त केल्याची माहिती आहे.
साभार :- देशोन्नती
I admired 'Suresh Lonkar' for his strength of character and his faith. I will continue to be inspired by the actions he took and the things he said while he was alive. He will live in memories.
ReplyDelete