घाटंजी येथे श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त १४ फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. १४ रोजी कलश स्थापना, काकड आरती, अभिषेक, प्रवचन, पारायण, हरिपाठ, सामूहिक प्रार्थना, कीर्तन, भक्तीसंगीत, भजन, होमहवन, पालखी मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ घेण्याची विनंती श्री गजानन महाराज संस्थान सार्वजनिक ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे.
श्री संत गजानन महाराजांच्या भक्तांनी येथे श्रींचा प्रगटदिन व समाधी दिवसाचा कार्यक्रम घेणे सुरू केले. पुढे श्रींचे भव्य, सुरेख मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला. सन १९८४ मध्ये सार्वजनिक ट्रस्ट तयार करून नोंदणी केली. मंदिर बांधकामासाठी जागेचा शोध घेण्यात आला. शेवटी पंचायत समिती जवळील १३ एकर शेत विकत घेण्यात आले. त्यातील पाच एकर जागा मंदिराकरिता आणि उर्वरित जागेत प्लॉट्स पाडून रक्कम उभी करण्यात आली. आलेल्या रकमेतून मंदिर उभारणी सुरू झाली. १९८७ मध्ये बांधकाम सुरू झाले.
सन १९९४ मध्ये जयपूरवरून आणलेली सव्वाचार फूट उंच व देखणी मूर्ती शास्त्रोक्त पद्धतीने मंदिरात स्थापन्यात आली. तसेच श्रीगणेश, राधाकृष्ण, विठ्ठल-रुक्मिणी, राणीसती आई मूर्तीची स्थापना करण्यात आली. मंदिरात दररोज आरती, पसायदान होत आहे. सोबत अनेक धार्मिक व सामाजिक कार्य सुरू आहे. प्रगटदिन व समाधीदिन दरवर्षी साजरा केला जातो.
मंदिरात होणार्या कार्यक्रमासाठी येणारे भाविक, दिंडीत सहभागी होणार्या वारकर्यांची थांबण्यासाठी होणारी अडचण लक्षात घेत भव्य भक्त निवास बांधण्यात आले आहे. दर गुरुवारी भाविकांकडून साहित्य स्वीकारून अन्नदान करण्यात येते. मंदिराच्या परिसरात फुल झाडे तसेच वड, पिंपळ, आवळा, आंबा, औदुंबर, बेल, पळस, तुळस, निम अशी अनेक मोठमोठी वृक्ष आहेत. कार्यक्रमासाठी मंदिर भवन उपलब्ध करून दिले जाते. याचा अनेक गरजूंना लाभ होत आहे.
साभार - लोकमत
Ghatanjicha ha pragat dinacha sohala ha samast ghatanjikaransathi abhimanachi gosht ahe. Darshanasathi ghatanjila yenaryanchi sankhya dar varshi vadhte ahe. Gan Gan Ganat Bote.
ReplyDelete