Pages

Sunday, 5 February 2012

घराणेशाहीच्या चिखलात भाजपाचे कमळ फुलणार - रमेश यमसनवार

पारवा गट व गणात भाजप उमेदवारांची आघाडी

पारवा सर्कल आजवर घराणेशाहीच्या चिखलातच राहिल्याने या परिसराचा विकास झाला नाही. मात्र यावेळी याच चिखलात भाजपाचे कमळ फुलवून विकासाचा नवा अध्याय सुरू करणार असल्याचा विश्वास पारवा गटातील भाजपाचे उमेदवार रमेश यमसनवार यांनी व्यक्त केला. पारवा जि.प.सर्कलसह कुर्ली व पारवा गणातही भाजपाच्या उमेदवारांना जनतेचा स्वयंस्फूर्त पाठींबा मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. 
ईतर पक्षाच्या पारंपारिक उमेदवारांचा अनुभव जनतेने घेतला आहे. निवडणुकीच्या काळात हात जोडतात. मात्र त्यानंतर पुढच्या पाच वर्षात कधी ढुंकूनही पाहात नाहीत. मात्र माझी उमेदवारी सर्वसामान्य जनतेतून असुन निवडून आल्यावर जनतेतच राहायचे असल्याने प्रत्येक क्षणी शेतकरी व सर्वसामान्यांच्या कामासाठी तत्पर राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले. राज्य व केंद्र शासनात कॉग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असतांना सुद्धा शेतक-यांना न्याय मिळाला नाही. सर्वत्र कापसाच्या भावासाठी आंदोलने झाली मात्र सरकार व कॉंग्रेस रा.कॉ. नेत्यांनी जनक्षोभ दुर्लक्षीत केला. 
आता उमेदवारांच्या प्रचारात उतरलेले स्थानीक नेते आंदोलनाच्या वेळी शेतक-यांना न्याय मिळावा म्हणुन का पुढे आले नाही असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. पारवा पंचायत समिती गणात अरूणा वासुदेवराव  महल्ले व कुर्ली गणात सुशिक्षीत उमेदवार गजानन गाऊत्रे यांना भाजपाने संधी देऊन सर्वसामान्य जनतेतून उमेदवार उभा करण्याची परंपरा कायम राखली आहे. 
पंचायत समिती गणातही भाजप उमेदवारांना जनता आनंदाने कौल देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापुर्वी ग्रामपंचायत सदस्य राहिलेले रमेश यमसनवार पारवा परिसरात सुपरिचीत आहेत. काही वर्षांपुर्वी या भागात महापुर आला त्यावेळी ते पुरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वयंस्फुर्तीने पुढे आले होते. अन्न, कपडे व निवारा या मुलभूत गोष्टींसाठी त्यांनी पुरग्रस्तांना मोलाची मदत केली होती. येथिल नवशक्ती दुर्गोत्सव मंडळाचे ते २७ वर्षांपासून अध्यक्ष आहेत. धार्मिक व सामाजीक कार्यात ते नेहमीच पुढे असतात. सुमारे दहा वर्षांपुर्वी कुर्ली येथे पाण्याची तिव्र टंचाई असतांना स्वखर्चाने उन्हाळाभर त्यांनी मित्रमंडळींच्या सहकार्याने ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला होता. मतदार संघातील जवळजवळ प्रत्येक माणसाला त्यांची ओळख आहे. पारवा गटातील कुर्ली, वघारा, राजापेठ, पारवा, सावरगाव, सावंगी, सायतखर्डा, बोधडी, दत्तापुर, झटाळा, तरोडा, वाढोणा, मेसदा, गणेरी, भीमकुंड, पंगडी, येरंडगाव, देवधरी या गावांसह ईतर सर्वच ठिकाणी जनतेचा उत्स्फूर्त पाठींबा मिळत असल्याचे त्यांनी सांगीतले. कुर्ली व पारवा गणातील उमेदवारांनाही जनतेचे सहकार्य मिळणार असल्याचे त्यांनी सांगीतले. 
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सत्ता हाती असल्याने विकास करण्याचा प्रचार करीत आहेत. मात्र आजवर त्यांनी काय विकास साधला असा प्रश्न त्यांना जनता विचारत असल्याचे ते म्हणाले. भारतीय जनता पक्षाचे खासदार हंसराज अहिर यांनी चंद्रपूर भागात केलेला विकास आता घाटंजी तालुक्यातही करायचा असुन त्यांच्या मदतीने विकासनिधी खेचून आणुन या भागातील समस्या सोडविणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. सर्वसामान्याना न्याय देण्यासाठी असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगीतले.
साभार :- देशोन्नती

No comments:

Post a Comment