आणखी एका ईसमाला १५ हजारांनी गंडविले
पोलीस यंत्रणेला तक्रारीची वाट
मोबाईलवर कॉल करून लॉटरी व तत्सम बक्षिसांचे आमिष दाखवुन हजारो रूपयांनी गंडा घालण्याचा प्रकार अजुनही सुरूच आहे. प्रशांत कुंभारे नामक ईसम या आमिषाला बळी पडल्याने तब्बल १५ हजार रूपयांनी फसविल्या गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
यापुर्वी देशोन्नती ने ‘मोबाईलवर कॉल करून गंडविणारे आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रीय’ या बातमी मधुन हा प्रकार उघडकीस आणला होता. त्यानंतर काही मोबाईल कंपन्यांनी अशा कॉल पासुन सावध राहण्याबाबत ग्राहकांना एस.एम.एस.द्वारे सुचनाही दिल्या होत्या. मात्र पोलीस यंत्रणेने ही बाब अद्यापही गंभिरतेने न घेतल्यामुळे फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. याबाबत विस्तृत माहिती अशी की, प्रशांत मुकींदा कुंभारे रा. हिरापूर जि.वर्धा यांना त्यांचा भ्रमणध्वनी क्रं.९७६७२९२७३१ यावर ९२३४४४८३१३०८ या क्रमांकावरून कॉल आला. तुम्हाला १० लाख रूपयांची लॉटरी लागली आहे. मात्र त्यासाठी बँक खाते क्रं.३०११७१०२८९४ यामध्ये १५ हजार २०० रूपये टाका असे सांगण्यात आले. त्यावेळी कुंभारे हे यवतमाळ तालुक्यातील त्यांची सासुरवाडी जवळा ईजारा येथे आले होते. त्यांनी कॉलवर विश्वास ठेवून अकोलाबाजार स्टेट बँकेत संबंधीत खात्यावर पैसे जमा केले. त्यानंतर ११ फेब्रुवारीला त्यांना ००९२३४१६९०८६७३ या क्रमांकावरून पुन्हा कॉल आला. आणखी २४ हजार रूपये खाते क्रं.१०८८७५९८११९ (खातेधारक - प्रदिपकुमार) किंवा ०७१००१५०१९५१ (खातेधारक - झिया उल हक सिद्धीकी) या खात्यामध्ये पैसे भरण्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र कुंभारे यांना शंका आल्याने त्यांनी पैसे भरले नाहीत. १३ फेब्रुवारीला त्यांना पुन्हा कॉल आला व किमान ६ हजार रूपये तरी खात्यात भरावे लागतील अन्यथा १० लाखांची रक्कम अनाथालयाला जाईल असे सांगण्यात आले. फोनवर बोलणा-या व्यक्तीने आपण कंपनीचे डी.एम.असल्याचे सांगीतले. आपण फसविल्या गेल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी रक्कम भरली नाही.
कुंभारे यांनी ज्या खात्यात पैसे जमा केले ते खाते अमितसिंग चंद्राकेस सिंग विला रा. इंद्रानगर गोरखपुर या व्यक्तीचे असल्याचे बँकेत चौकशी केली असता निदर्शनास आले. वृत्त लिहिस्तोवर घटनेची तक्रार करण्यात आली नव्हती. त्याचप्रमाणे आज दुपारी १ वाजुन १२ मिनीटांनी नरेंद्र ढवळे रा.दहेगाव यांना ९१९१९९१७७१८३ या क्रमांकावरून कॉल आला. अडीच लाख रूपयांचे बक्षिस लागल्याचे त्यांना सांगीतल्या गेले. बक्षिसाची रक्कम १० मिनीटातच तुमच्या बँक खात्यात टाकण्यात येईल असेही संबंधीताने त्यांना सांगीतले. मात्र त्यासाठी कमलेश कुमार नामक व्यक्तीच्या खाते क्रं. ३१९५१७४३८०७ यावर २ हजार ६०० रूपये भरा अशी अट ठेवण्यात आली. ढवळे यांनी ‘देशोन्नती’ मध्ये याबाबतचे वृत्त वाचलेले असल्याने हे गौडबंगाल असल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यामुळे त्यांनी पैसे भरले नाहीत. शिवाय या प्रकाराची पोलीसात तक्रार करणार असल्याचेही त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगीतले.
गेल्या काही महिन्यांपासुन अशा ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. मात्र पोलीस यंत्रणा याकडे कोणाचीही तक्रार नसल्याने सपशेल दुर्लक्ष करीत आहे. आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल येत असल्याने भारतालगत असलेल्या देशांमधुन असे रॅकेट चालविल्या जात असल्याच्या संशय व्यक्त होत असुन यंत्रणेने आपल्या स्तरावर या रॅकेटचा शोध घेण्याची मागणी जोर धरत आहे.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment