जुलै महिन्यात आलेल्या पुरानंतर पडझड झालेल्या घरांचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सदोष सर्वेक्षण केल्याने सुमारे ४१ कुटूंबे मदतीपासुन वंचीत राहणार असल्याची तक्रार कोळी (बु.) येथिल ग्रामस्थांनी केली आहे. महापुरामुळे भयभित झालेल्या ग्रामस्थांनी अंगावरच्या कपड्यावरच बाहेर पडून जीव वाचवला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री, विरोधी पक्ष नेते, जिल्ह्यातील आमदार मंत्री, खासदार, आमदार तात्काळ येऊन पाहणी करून गेले. शासनाची मदत मिळावी यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार तलाठी चंदु भोयर यांनी पंचनामे केले. घरांच्या पडझडीचे मुल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले. मात्र सदोष पद्धतीने मुल्यांकन करण्यात आल्याने सुमारे ४१ कुटूंब पडझड नुकसानापासुन वंचीत राहिले. ही माहिती मुख्यमंत्र्यांच्या दौ-यापुर्वी तहसिलदारांना देण्यात आली होती. नुकसान झालेल्या सर्वांना मदत मिळेल असे महसुल विभागामार्पâत सांगण्यात आले होते. मात्र अद्याप पर्यंत मदत मिळालेली नाही. कोळी (बु.) या गावात आपत्तीमुळे झालेली हानी मोठ्या प्रमाणात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौ-यानंतर कुणीही अधिकारी भेट देण्यास आला नाही. एकंदरीतच शासन प्रशासनाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे पुरग्रस्त वा-यावर आहेत. या सर्व समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात या मागणीचे निवेदन कोळी (बु.) येथिल ग्रामस्थांनी उपसरपंच चंद्रप्रकाश खरतडे यांच्या नेतृत्वात तहसिलदारांना दिले. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट देऊन पुरग्रस्तांच्या व्यथा त्यांच्यापुढे मांडणार असल्याचे खरतडे यांनी सांगितले.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment