Pages

Showing posts with label पुरग्रस्त. Show all posts
Showing posts with label पुरग्रस्त. Show all posts

Saturday, 13 October 2012

घाटंजी तालुक्यातील पुरग्रस्तांपुढे आता मोठ्या समस्या नाहीत - ना.शिवाजीराव मोघे


तालुक्यातील पुरग्रस्त आता आता ब-याच अंशी सावरले असुन त्यांच्यापुढे कोणतेही ‘मेजर प्रॉब्लेम्स’ नाहीत अशी माहिती राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांनी पत्रपरिषदेत दिली. घाटंजी तालुक्यातील पुरग्रस्त गावांचा दौरा केल्यावर येथिल शासकीय विश्रामभवनात ते पत्रपरिषदेला संबोधीत करीत होते.
यावेळी तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष ईकलाख खान पटेल, घाटंजीचे नगराध्यक्ष जगदिश पंजाबी, तहसिलदार प्रकाश राऊत यांची उपस्थिती होती. सध्याच्या परिस्थितीत पुरामुळे वाहुन गेलेल्या विजेच्या खांबांना उभारणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी आधी विज वितरण वंâपनीच्या नियमानुसार विज बिल भरावे लागेल असे ते म्हणाले. पुरामुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण पुर्ण झाले असुन मदतीबाबत कॅबिनेट मध्येच निर्णय होईल त्यावर आता काहीही बोलता येणार नाही असे एका प्रश्नाला उत्तर देतांना ते म्हणाले. तालुक्यात जाहिर झालेला दुष्काळ हा ओला होता की कोरडा यावर ते म्हणाले की याबाबत आपल्याला वर्तमानपत्राच्या बातमीवरूनच माहिती मिळाली. नेमक्या कोणत्या माहितीच्या आधारे हा दुष्काळ जाहिर करण्यात आला याबद्दल अनभिज्ञ असल्याचे त्यांनी सांगितले. 
उपविभागीय कार्यालय आर्णीला होणार असल्याच्या निर्णयावर ते म्हणाले की तो निर्णय शासनाच्या नियमाला अनुसरूनच होत असुन त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नाही. घाटंजी नगर परिषदेत कॉंग्रेसच्या नेतृत्वातील सत्ता असुनही आवश्यक त्या प्रमाणात निधी उपलब्ध होत नाही यावर ते म्हणाले की नगर परिषदेने मागणी केल्यास निधीची कमतरता पडू दिल्या जाणार नाही. मात्र याबाबत नगराध्यक्ष जगदिश पंजाबी यांना छेडले असता निधीची मागणी सुरूच आहे. तडकाफडकी सर्व कामे शक्य नाहीत. साहेबांकडून गेल्या तिस वर्षात काही घडले नाही ते आता काय घडणार ? असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी ना.मोघेंनी तालुक्यात प्रस्तावीत असलेल्या विवीध विकासकामांची माहिती दिली. त्यामध्ये निवासी शाळा, मोवाडा आश्रमशाळेचे जांब येथे स्थानांतरण, अनुसूचीत जमातीच्या मुलामुलींसाठी वस्तीगृह, घाटंजी येथे क्रिडा संकुल तसेच विवीध सहा ठिकाणी पुल बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
साभार :- देशोन्नती  

Monday, 10 September 2012

सा.बां.विभागाच्या सदोष सर्वेक्षणामुळे पुरग्रस्त मदतीपासुन वंचीत



जुलै महिन्यात आलेल्या पुरानंतर पडझड झालेल्या घरांचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सदोष सर्वेक्षण केल्याने सुमारे ४१ कुटूंबे मदतीपासुन वंचीत राहणार असल्याची तक्रार कोळी (बु.) येथिल ग्रामस्थांनी केली आहे. महापुरामुळे भयभित झालेल्या ग्रामस्थांनी अंगावरच्या कपड्यावरच बाहेर पडून जीव वाचवला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री, विरोधी पक्ष नेते, जिल्ह्यातील आमदार मंत्री, खासदार,  आमदार तात्काळ येऊन पाहणी करून गेले. शासनाची मदत मिळावी यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार तलाठी चंदु भोयर यांनी पंचनामे केले. घरांच्या पडझडीचे मुल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले. मात्र सदोष पद्धतीने मुल्यांकन करण्यात आल्याने सुमारे ४१ कुटूंब पडझड नुकसानापासुन वंचीत राहिले. ही माहिती मुख्यमंत्र्यांच्या दौ-यापुर्वी तहसिलदारांना देण्यात आली होती. नुकसान झालेल्या सर्वांना मदत मिळेल असे महसुल विभागामार्पâत सांगण्यात आले होते. मात्र अद्याप पर्यंत मदत मिळालेली नाही. कोळी (बु.) या गावात आपत्तीमुळे झालेली हानी मोठ्या प्रमाणात आहे. 
मुख्यमंत्र्यांच्या दौ-यानंतर कुणीही अधिकारी भेट देण्यास आला नाही. एकंदरीतच शासन प्रशासनाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे पुरग्रस्त वा-यावर आहेत. या सर्व समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात या मागणीचे निवेदन कोळी (बु.) येथिल ग्रामस्थांनी उपसरपंच चंद्रप्रकाश खरतडे यांच्या नेतृत्वात तहसिलदारांना दिले. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट देऊन पुरग्रस्तांच्या व्यथा त्यांच्यापुढे मांडणार असल्याचे खरतडे यांनी सांगितले.
साभार :- देशोन्नती  

Wednesday, 15 August 2012

कृषी साहित्य विक्रेत्यांकडून पुरग्रस्तांना मदत


तालुक्यातील कृषी साहित्य विक्रेता संघाच्या वतीने पुरग्रस्त गावांमधील शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. कोपरी (कापसी) व कवठा या पुरग्रस्त गावांमध्ये हे साहित्य वाटप करण्यात आले. पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. तसेच भास्कर अंजीकर, संजय पालतेवार, अभय कटकमवार, भावेश गंढेचा, राजेश र्इंगोले, प्रमोद हांडे, ललित सुचक, स्वप्नील भांडारवार, प्रशांत नित, प्रकाश काकडे, नरेंद्र माडूरवार, किशोर सोनटक्के, सखाराम बिबेकार, चिकराम, उईके हे यावेळी उपस्थित होते.
साभार :- देशोन्नती  

Sunday, 12 August 2012

पुरग्रस्तांचे जीवन उभारणारा कार्यक्रम राबवणार

मुख्यमंत्र्यांनी दिला आश्वासक शब्द



















 




अतिवृष्टीने आलेल्या पुरामध्ये ज्यांचे सर्वस्व वाहुन गेले त्यांचे जीवन नव्याने उभारणारा कार्यक्रम राबविणार या आश्वासक शब्दांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.पृथ्वीराज चव्हाण यांनी घाटंजी तालुक्यातील पुरग्रस्तांचे सांत्वन केले. पुरग्रस्त भागाच्या पाहणी दौ-यामध्ये कोळी (बु.) येथे पुरग्रस्तांना संबोधीत करतांना ते बोलत होते. पुररेषेखाली येणा-या धोकादायक गावांचे सुरक्षीतस्थळी पुनर्वसन करण्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल, पुनर्वसनाबाबतचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत असे त्यांनी सांगीतले.
यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री ना.नितिन राऊत, सामाजीक न्यायमंत्री ना.शिवाजीराव मोघे, अन्न व औषध प्रशासनमंत्री ना.मनोहर नाईक, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके,  आमदार निलेश पारवेकर, विजय खडसे, वामनराव कासावार, संजय राठोड, संजय देशमुख यांचेसह मान्यवरांची उपस्थिती होती.
पुरग्रस्तांशी हितगूज करतांना ते पुढे म्हणाले की, कधी नव्हे एवढा महापुर या भागात आला. ढगफुटीमुळे एकाच दिवशी तब्बल २९० मि.ली.पावसाची विक्रमी नोंद झाली. प्रशासकीय यंत्रणा झालेल्या नुकसानाचे पंचनामे करीत आहे. मात्र कुटूंबांचे झालेले नुकसान केवळ पंचनाम्याने कधीच भरून निघणार नाही. पुरात जीवन किती उध्वस्त होते याची जाणीव असल्याचे ते यावेळी म्हणाले. अतिवृष्टीच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. त्यामुळे पुराचा धोका असलेल्या गावांचे गावापासुन जवळ असलेल्या सुरक्षीतस्थळी पुनर्वसन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जिथे जमिन मिळणार नाही तिथे अधिग्रहण करून पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जातील. घाटंजी तालुक्याचा परिसर रम्य आहे. येथिल शेतकरी कष्टाळू आहे. योग्य सोयीसुविधा मिळाल्या तर आत्महत्याग्रस्त परिसरातील शेतकरी सुखी होऊ शकतील. या भागातील शेतक=यांनी ठिबक सिंचनाचा वापर केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल त्यासाठी शासन अनुदान सुद्धा देईल असे त्यांनी सांगीतले. राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने पुरग्रस्तांच्या दु:खात सहभागी असुन त्यांना शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
दुपारी १२ वाजुन ५० मिनीटांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा कोळी (बु) येथे पोहचला. आमदार निलेश पारवेकर हे स्वत: मुख्यमंत्री बसुन असलेली पजेरो गाडी चालवित होते. याच गाडीमध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणीकराव ठाकरे, पालकमंत्री ना.नितीन राऊत हे देखिल होते.  कोळी (बु) चे उपसरपंच चंद्रप्रकाश खरतडे यांनी मुख्यमंत्र्यांना गावात झालेल्या भिषण नुकसानाची माहीती दिली. रामपुर प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय पुराम व त्यांच्या चमुकडून मुख्यमंत्र्यांनी या भागातील आरोग्य विषयक बाबींबद्दल विचारणा केली.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी विवीध संघटना व नागरिकांची निवेदने स्विकारून त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.  कवठा (खु.), चांदापुर (आश्रम), किन्ही, विरूळ, कोळी (खु.), कापसी (कोपरी) या पुराने सर्वाधीक बाधीत झालेल्या गावातील अनेक ग्रामस्थ मुख्यमंत्र्यांपुढे आपली संवेदना व्यक्त करण्यासाठी कोळी (बु) येथे जमले होते.


पुरग्रस्तांना मायेचा आधार द्यावा - ना.मोघे

घाटंजी तालुक्यात प्रथमच पुरामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी भरीव मदत करून पुरग्रस्तांना मायेचा आधार द्यावा अशी मागणी सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांनी केली. पुरग्रस्तांसाठी सध्या घराची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे लाभार्थ्याची उत्पन्न मर्यादा न पाहता सर्व पुरग्रस्तांना सरसकट घरे देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.

हारतुरे स्वागत स्विकारले नाही

आपल्या गावात राज्याचे मुख्यमंत्री येणार या आशेने सुखावलेल्या पुरग्रस्त कोळी गावातील ग्रामस्थांनी आपल्या वेदना विसरून मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची तयारी केली होती. ग्रामिण भागातील परंपरेनुसार कार्यक्रमस्थळी पाय धुवायला पाणी ठेवले होते. तसेच स्वागतासाठी पुष्पहार आणण्यात आले होते. मात्र कोणत्याही प्रकारच्या स्वागतास मुख्यमंत्र्यांनी नम्र नकार दिला. केवळ कपाळी अक्षत लावुन घेतल्यावर त्यांनी लगेच गावाची पाहणी करण्यासाठी प्रस्थान केले.

फलकातूनही दिसली पुराची भिषणता

पावसाच्या पाण्याने सर्वस्व वाहुन गेलेल्या ग्रामस्थांनी आपल्या गावाची ओळख दाखविण्यासाठी आणेलेले फलक सुद्धा पावसाची भिषणता दाखवित होते. कुणी वापरण्यासाठी असलेल्या एकमेव उपरण्यावर गावाचे नाव लिहीले होते तर कुणी फाटक्या धोतराच्या कापडावर. गावाचे नाव लिहीलेले कापड सुद्धा पावसात भिजल्याने नावे धुसर झाली होती. या भिजलेल्या कापडांमधुन गावात पावसाने घातलेल्या थैमानाचे चित्र स्पष्ट दिसत होते.
अमोल राऊत
साभार :- देशोन्नती  

छायाचित्र सौजन्य :-
संदिप डिजीटल फोटो स्टुडीओ, शिरोली 
(प्रो.प्रा.संदिप वानखडे), Mob.No.9421770650
निलेश जुनगरे, शिरोली




Friday, 10 August 2012

पुरग्रस्त विद्यार्थ्यांना साहित्य संसदेतर्फे पोशाख वाटप


तालुक्यात आलेल्या महापुरामुळे उध्वस्त झालेल्या कोळी (बु), डांगरगाव, विरूळकवठा, कापसी कोपरी व माणुसधरी या गावातील सुमारे २७० शालेय विद्यार्थ्यांना फुले आंबेडकरी साहित्य संसदेतर्फे पोशाख वाटप करण्यात आले. बुद्ध धम्मात वर्षावासाच्या कालावधीत दान करणे महत्वाचे समजले जाते. त्यानुषंगाने पुरात सर्वस्व वाहुन गेलेल्या कुटूंबातील विद्यार्थ्यांचे शैक्षणीक महत्व लक्षात घेता विद्याथ्र्यांना पोशाखाचे वाटप करण्यात आले. पुज्य भन्ते विपश्यी पुज्य भन्ते धम्मसागर, आर्याजी बुद्धकन्या आर्याजी प्रजापती यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान  फुले  आंबेडकरी साहित्य संसदेचे जिल्हाध्यक्ष किशोर भगत होते.
यवतमाळ नगर परिषदेचे सदस्य टोनु उर्फ पंकज मेश्राम, नितिन मेश्राम, आनंद लोखंडे, तालुकाध्यक्ष सुनिल नगराळे, भगवान सरदार, देवकुमार शेंडे, प्रदिप गवळी आदी उपस्थित होते.
कोळी येथे सरपंच सुभद्रा मरापे, उपसरपंच चंद्रप्रकाश खरतडे, एस.एच.डोंगरे, पोलीस पाटील सुभाष डफडे, आनंद कोरवते, आनंद बावणे, गजानन बावणे, नारायण गिनगुले यांच्या उपस्थितीत गणवेश दान देण्यात आले.
डांगरगाव येथे ज्ञानेश्वर महल्ले, प्रभाकर भगत, मुख्याध्यापक ए.डी.राठोड, शिक्षक के.डी.मुनेश्वर, कवठा विरूळ येथे प्रभाकर धांदे, मुख्याध्यापक एस.एम.पुनसे, डी.एम.परतेती, ग्रामसेवक एम.व्ही.गाऊत्रे, कापसी कोपरी येथे उपसरपंच उत्तम बिबेकर, मुख्याध्यापक व्ही.एम.चिकराम, ए.एल. उईके, ग्रामसेवक जुडे, तर माणूसधरी येथे प्रविण बनसोड, जितेंद्र खरतडे, राजु खरतडे, शेख अयुब, मुख्याध्यापक व्ही.एस.तगलपल्लेवार, व्ही.एस.लोखंडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन एम.एस.चांदेकर, आर.एस.ताटेवार, एस.पी.वेले, डी.एम.मोहुर्ले यानी तर आभार स्थानिक शिक्षकांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेंद्र देवतळे, अशोक तोडसाम, संजय गुल्हाणे, प्रतिक अडवलवार यांनी परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती 

Saturday, 28 July 2012

पाणी ओसरले ; अन आता वेदनांची भरती

राजकारण्यांच्या भेटी फोटोसेशनसाठी
दानशुरांच्या मदतीवरच पुरग्रस्त अवलंबुन

जिंदगी बित जाती है ईक आशिया बनानेमे !!
पर हाय ए कुदरत; तरस नही खाती, बस्तीया उजाडनेमे !!
सिमेंट मातीच्या खोल्याना घर बनविण्यासाठी माणसाला आयुष्य वेचावे लागते, मात्र माणसावर ओढवणारी नैसर्गिक आपत्ती क्षणात असे अनेक घरे जमीनदोस्त करते. अशावेळी काळाच्या पडद्याआड आपत्ती दडून जाते मात्र ती निघुन गेल्यावरही वेदना कायम राहतात. याची प्रचिती जिल्हावासियांना आज होत आहे.
अनेक दिवस चातकासारखी ज्या पावसाची सर्वजण वाट पाहात होते तो अचानक २२ जुलै रोजी अवतरला. मात्र सुजनाचे प्रतिक असलेल्या या पावसाने आपले विध्वंसक रूप घेतल्याने सारेच काही गंगेला मिळाले अशी परिस्थिती घाटंजी तालुक्यातील हजारो पुरग्रस्तांवर ओढवली आहे. अनेकांचे संसार डोळ्यादेखत बुडाले, कवडी कवडी जमवुन बांधलेले घर क्षणार्धात कोसळले.  खाण्याची सोय नाही, पाण्याने सर्वस्व नेले मात्र आता प्यायलाही पाणी नाही, अंगावरचे कपडेच तेवढे शिल्लक राहिलेत. त्यामुळे आता घालायचे काय हा मोठा प्रश्न. अख्खे गावच पाण्याखाली गेल्याने आता झोपायचे कोठे ही समस्याही आ वासुन उभी. अशी भिषण परिस्थिती गेल्या अनेक वर्षात प्रथमच घाटंजी तालुक्यावर ओढवली आहे. शासकीय यंत्रणेची ईतर मदत तर सोडाच पण बहुतांश गावांमध्ये शासनाचे पाणीही पोहचले नाही. सारेच राजकीय नेते, मंत्री, आमदार येऊन सांत्वना करून गेले. मात्र त्यांची सांत्वना व तोकडी मदत ही केवळ फोटोसेशन करण्यापुरतीच असल्याचे आता निदर्शनास येत आहे. सर्व आपदग्रस्त केवळ दानशुरांनी पुरविलेल्या अन्न पाण्यावरच जगत आहेत. नैसर्गीक आपत्तीग्रस्तांना देण्यात येणारी सानुग्रह राशी सुद्धा अजुन पर्यंत एकाही कुटूंबापर्यंत पोहचली नाही. 
सर्वाधीक नुकसान झालेल्या गावांमध्ये कवठा खुर्द येथे २०० घरे पुर्णपणे उध्वस्त झाले तर ८० घरे अंशत: बाधीत झाली.
कोळी बु.येथे १५५ घरे पुर्णत: ४० घरे अंशत:, कोपरी येथे ८० घरे पुर्णत: २० घरे अंशत:, डांगरगाव येथे ४० घरे पुर्णत: २० अंशत:, माणुसधरी येथे ६० घरे पुर्णत: १५ घरे अंशत:, चांदापुर येथे ३० घरे पुर्णत: व १५ अंशत:, चिंचोली येथे ३५ पुर्णत: १५ अंशत:, निंबर्डा ३६ पुर्णत: १८ अंशत:, तर घाटंजी शहरात १२५ घरांचे पुर्णत: व २०० घरांचे अंशत:, घाटी भागात २५ घरांचे पुर्णत: तर ५० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. शेतपिकाला तर पावसाचा चांगलाच फटका बसला असुन ५० गावातील तब्बल २ हजार ४०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा शासकीय यंत्रणेचा प्राथमिक अंदाज असुन हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मात्र प्रशासनाचा हा प्राथमिक अंदाज चुकीचा असुन प्रत्यक्षात झालेली हानी प्रचंड आहे. या सर्वेक्षणातही राजकारण शिरण्याची भीती असुन आपल्या राजकीय फायद्यासाठी स्थानिक नेते आपापल्या जवळच्या लोकांची नावे यामध्ये घुसविण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हे सर्वेक्षण राजकारण विरहीत व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.
अनेक गावांना जोडणारे नदी नाल्यांवरील पुल पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याने त्या गावांचा संपर्वâच तुटला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप या दुष्टीने कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही.
पावसात उध्वस्त झालेल्या सर्व गावांमध्ये इतर गावांमधुन तसेच घाटंजी शहरातुन शिजवलेले अन्न, कपडे व ईतर साहित्य पुरविण्यात येत आहे.
अमोल राऊत


साभार :- देशोन्नती 

Thursday, 26 July 2012

घाटंजी तालुक्यात पावसाचे भिषण तांडव

२ हजार कुटूंबांना पुराचा फटका
अडीच हजार हेक्टरवरील पिक वाहुन गेले
कोट्यवधींचे नुकसान









गेल्या दोन दिवसांपासुन घाटंजी तालुक्यात कोसळत असलेल्या संततधार पावसाने तब्बल अडीच हजार हेक्टर शेतातील पिके खरडून नेली. तर सुमारे २ हजार कुटूंबे पावसाच्या तडाख्याने बेघर झाली आहेत.या पावसामुळे तालुक्यात कोट्यवधी रूपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पावसाच्या पाण्यात ९ जनावरे वाहुन गेली तर १ हजार १०३ घरे अंशत: व ९०५ घरे पुर्णपणे उध्वस्त झाले. दि.२२ जुलैच्या रात्री पासुन सुरू झालेल्या संततधार पावसाने संपुर्ण घाटंजी तालुक्यात धिंगाणा घातला. अनेक गावांना पुराचा फटका बसला. काही गावे तर पुर्णपणे पाण्याखाली गेल्याने तेथिल नागरिकांना जंगलात रात्र काढावी लागली. घरातील साहित्य, कपडे, धान्य व पावसाची वाट पाहात राखुन ठेवलेले बि.बियाणे, रासायनिक खतेही पावसाने वाहुन नेली. सर्वाधीक नुकसान झालेल्या गावांमध्ये कवठा खुर्द येथे २०० घरे पुर्णपणे उध्वस्त झाले तर ८० घरे अंशत: बाधीत झाली. कोळी बु.येथे १५५ घरे पुर्णत: ४० घरे अंशत:, कोपरी येथे ८० घरे पुर्णत: २० घरे अंशत:, डांगरगाव येथे ४० घरे पुर्णत: २० अंशत:, माणुसधरी येथे ६० घरे पुर्णत: १५ घरे अंशत:, चांदापुर येथे ३० घरे पुर्णत: व १५ अंशत:, चिंचोली येथे ३५ पुर्णत: १५ अंशत:, निंबर्डा ३६ पुर्णत: १८ अंशत:, तर घाटंजी शहरात १२५ घरांचे पुर्णत: व २०० घरांचे अंशत:, घाटी भागात २५ घरांचे पुर्णत: तर ५० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. शेतपिकाला तर पावसाचा चांगलाच फटका बसला असुन ५० गावातील तब्बल २ हजार ४०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा शासकीय यंत्रणेचा प्राथमिक अंदाज असुन हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घाटंजी शहरातील काही नेहरू नगर, घाटी, पांढुर्णा रोड, आनंद नगर मधील घरांमध्ये पाणी घुसल्याने तेथिल  राहिवाशाना न.प.शाळा, गजानन महाराज मंगल कार्यालय, सोनु मंगलम, पंजाबी लॉन, न.प.सांस्कृतिक भवन या ठिकाणी हलविण्यात आले. येथे या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था सर्व  नगरसेवक, व्यापारी व सामाजीक कार्यकर्त्यांनी केली. कोळी बु. हे गाव अडाण नदीच्या काठी असल्याने या गावाला पुराचा सर्वाधीक फटका बसला. संततधार पावसामुळे अडाण नदीला आलेल्या पुराचे पाणी गावात शिरले व पाहता पाहता संपुर्ण गाव पाण्याखाली गेले. त्यामुळे येथिल नागरीकांना गावालगत असलेल्या आश्रमशाळेत आश्रय घ्यावा लागला. शिरोली येथिल नागरीकानी पुरग्रस्तांसाठी आवश्यक साहित्य पुरविले. तर विलास निलावार यांनी या नागरीकांसाठी खिचडीची व्यवस्था केली. तालुक्यातील शासकीय यंत्रणेच्या वेळकाढु धोरणामुळे शासकीय मदत मात्र वेळेवर पोहचली नसल्याची माहिती आहे.. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.नितीन राऊत, यवतमाळचे आमदार निलेश पारवेकर यांनी पुरग्रस्त गावांना भेट देऊन नुकसानाची पाहणी केली. तर जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यानी या भागांचा दौरा केला. उपविभागीय अधिकारी एस.ए.खांदे, तहसिलदार प्रकाश राऊत हे देखिल गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानाची पाहणी करीत आहेत. दोन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन नुकसानाचा शासकीय अंदाज व प्रत्यक्षात झालेले नुकसान यात प्रचंड तफावत आहे. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप न होऊ देता वास्तविक नुकसानाचे सर्वेक्षण केल्या जावे अशी मागणी होत आहे.