राजकारण्यांच्या भेटी फोटोसेशनसाठी
दानशुरांच्या मदतीवरच पुरग्रस्त अवलंबुन
जिंदगी बित जाती है ईक आशिया बनानेमे !!
पर हाय ए कुदरत; तरस नही खाती, बस्तीया उजाडनेमे !!
सिमेंट मातीच्या खोल्याना घर बनविण्यासाठी माणसाला आयुष्य वेचावे लागते, मात्र माणसावर ओढवणारी नैसर्गिक आपत्ती क्षणात असे अनेक घरे जमीनदोस्त करते. अशावेळी काळाच्या पडद्याआड आपत्ती दडून जाते मात्र ती निघुन गेल्यावरही वेदना कायम राहतात. याची प्रचिती जिल्हावासियांना आज होत आहे.
अनेक दिवस चातकासारखी ज्या पावसाची सर्वजण वाट पाहात होते तो अचानक २२ जुलै रोजी अवतरला. मात्र सुजनाचे प्रतिक असलेल्या या पावसाने आपले विध्वंसक रूप घेतल्याने सारेच काही गंगेला मिळाले अशी परिस्थिती घाटंजी तालुक्यातील हजारो पुरग्रस्तांवर ओढवली आहे. अनेकांचे संसार डोळ्यादेखत बुडाले, कवडी कवडी जमवुन बांधलेले घर क्षणार्धात कोसळले. खाण्याची सोय नाही, पाण्याने सर्वस्व नेले मात्र आता प्यायलाही पाणी नाही, अंगावरचे कपडेच तेवढे शिल्लक राहिलेत. त्यामुळे आता घालायचे काय हा मोठा प्रश्न. अख्खे गावच पाण्याखाली गेल्याने आता झोपायचे कोठे ही समस्याही आ वासुन उभी. अशी भिषण परिस्थिती गेल्या अनेक वर्षात प्रथमच घाटंजी तालुक्यावर ओढवली आहे. शासकीय यंत्रणेची ईतर मदत तर सोडाच पण बहुतांश गावांमध्ये शासनाचे पाणीही पोहचले नाही. सारेच राजकीय नेते, मंत्री, आमदार येऊन सांत्वना करून गेले. मात्र त्यांची सांत्वना व तोकडी मदत ही केवळ फोटोसेशन करण्यापुरतीच असल्याचे आता निदर्शनास येत आहे. सर्व आपदग्रस्त केवळ दानशुरांनी पुरविलेल्या अन्न पाण्यावरच जगत आहेत. नैसर्गीक आपत्तीग्रस्तांना देण्यात येणारी सानुग्रह राशी सुद्धा अजुन पर्यंत एकाही कुटूंबापर्यंत पोहचली नाही.
सर्वाधीक नुकसान झालेल्या गावांमध्ये कवठा खुर्द येथे २०० घरे पुर्णपणे उध्वस्त झाले तर ८० घरे अंशत: बाधीत झाली.
कोळी बु.येथे १५५ घरे पुर्णत: ४० घरे अंशत:, कोपरी येथे ८० घरे पुर्णत: २० घरे अंशत:, डांगरगाव येथे ४० घरे पुर्णत: २० अंशत:, माणुसधरी येथे ६० घरे पुर्णत: १५ घरे अंशत:, चांदापुर येथे ३० घरे पुर्णत: व १५ अंशत:, चिंचोली येथे ३५ पुर्णत: १५ अंशत:, निंबर्डा ३६ पुर्णत: १८ अंशत:, तर घाटंजी शहरात १२५ घरांचे पुर्णत: व २०० घरांचे अंशत:, घाटी भागात २५ घरांचे पुर्णत: तर ५० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. शेतपिकाला तर पावसाचा चांगलाच फटका बसला असुन ५० गावातील तब्बल २ हजार ४०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा शासकीय यंत्रणेचा प्राथमिक अंदाज असुन हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मात्र प्रशासनाचा हा प्राथमिक अंदाज चुकीचा असुन प्रत्यक्षात झालेली हानी प्रचंड आहे. या सर्वेक्षणातही राजकारण शिरण्याची भीती असुन आपल्या राजकीय फायद्यासाठी स्थानिक नेते आपापल्या जवळच्या लोकांची नावे यामध्ये घुसविण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हे सर्वेक्षण राजकारण विरहीत व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.
अनेक गावांना जोडणारे नदी नाल्यांवरील पुल पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याने त्या गावांचा संपर्वâच तुटला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप या दुष्टीने कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही.
पावसात उध्वस्त झालेल्या सर्व गावांमध्ये इतर गावांमधुन तसेच घाटंजी शहरातुन शिजवलेले अन्न, कपडे व ईतर साहित्य पुरविण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment