घाटंजी - यवतमाळ मार्गावर भिषण अपघात
घाटंजी यवतमाळ मार्गावर सावरगड दर्ग्यापासुन सुमारे १ किलोमीटर अंतरावर एस.टी.बसने दुचाकीस भिषण धडक दिली. या धडकेत घाटंजी येथिल युवकाचा करूण अंत झाला. दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा भिषण अपघात घडला. या अपघातात विशाल सुभाष दिडशे (२०) हा एस.टी.खाली चिरडल्या गेल्याने जागीच ठार झाला. तर त्याच्या सोबत दुचाकीवर असलेला गौरव सुरेश कुडेगावे (१९) हा जखमी झाला. हा अपघात एवढा भिषण होता की, मृतकाचे डोके फुटून मेंदू बाहेर आला. तर गौरव कुडेगावे हा जखमी आहे. त्याच्यावर यवतमाळ येथिल खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. नेर आगाराची एम.एच.४० ८५९४ क्रमांकाची एस.टी. बस घाटंजी येथुन यवतमाळला जात होती. तर मृतक व जखमी युवक एम.एच.२९ एक्स. ८१३३ या क्रमांकाच्या दुचाकीने यवतमाळहून घाटंजीकडे येत होते. मृतक विशाल दिडशे हा यवतमाळ येथिल अध्यापक विद्यालयात डि.टी.एड. प्रथम वर्षाला शिकत होता. एस.टी.बसचा चालक हुकरे याला पोलीसांनी अटक केली. या घटनेची माहिती मिळताच घाटंजीतील सराफा मार्केट मधील व्यावसायीकांनी आपापली प्रतिष्ठाने बंद केली. या दु:खद घटनेबद्दल तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment