संग्रहीत छायाचित्र पत्नीला जाळुन मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी यादव आत्माराम राठोड (वय ४५) या माजी जिल्हा परिषद सदस्यास पारवा पोलीसांनी आज अटक केली. आर्णी तालुक्यातील केळझरा (कृष्णनगर तांडा) येथिल रहिवासी असलेला यादव राठोड याची पत्नी चंदा यादव राठोड दि.१४ डिसेंबरला सायंकाळी जळाल्याने त्यांना यवतमाळ येथिल शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. प्रकृती गंभिर असल्याने तातडीने सेवाग्राम येथे हलविण्यात आले. सध्या तिथेच त्यांचेवर उपचार सुरू आहेत. पतीनेच आपल्याला जाळुन मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे बयाण त्यांनी दिल्याने अनिल रामचंद्र जाधव यांच्या फिर्यादीवरून पारवा पोलीसांनी आरोपी पती यादव आत्माराम राठोड याचे विरूद्ध कलम ३०७, ४९८ भा.दं.वि.अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. |
No comments:
Post a Comment