Pages

Showing posts with label जिल्हा परिषद सदस्य. Show all posts
Showing posts with label जिल्हा परिषद सदस्य. Show all posts

Friday, 28 December 2012

वाढदिवसानिमित्य साड्यांचे वाटप



जिल्हा परिषद सदस्य योगेश पारवेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन पंगडी येथिल कार्यकर्त्यांनी गरजुंना साड्यांचे वाटप केले. गावातील मान्यवर व कॉंग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकर चिंचुलवार, रवि मुनेश्वर, संजय माळोदे, देविदास किनेकार, निलेश राऊत, गजानन कुंभारे, अनिता चव्हाण, नामु घोडाम, लक्ष्मण मेश्राम, महादेव कोडापे, संजु काकडे, गजानन चिंचुलवार, गजानन काकडे, विनायक मुनेश्वर, दादाराव मुनेश्वर, जयवंत कनाके यांनी परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती 

Saturday, 17 December 2011

पत्नीला जाळल्याच्या आरोपावरून माजी जि.प.सदस्यास अटक


संग्रहीत छायाचित्र
पत्नीला जाळुन मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी यादव आत्माराम राठोड (वय ४५) या माजी जिल्हा परिषद सदस्यास पारवा पोलीसांनी आज अटक केली. आर्णी तालुक्यातील केळझरा (कृष्णनगर तांडा) येथिल रहिवासी असलेला यादव राठोड याची पत्नी चंदा यादव राठोड दि.१४ डिसेंबरला सायंकाळी जळाल्याने त्यांना यवतमाळ येथिल शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. प्रकृती गंभिर असल्याने तातडीने सेवाग्राम येथे हलविण्यात आले. सध्या तिथेच त्यांचेवर उपचार सुरू आहेत. पतीनेच आपल्याला जाळुन मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे बयाण त्यांनी दिल्याने अनिल रामचंद्र जाधव यांच्या फिर्यादीवरून पारवा पोलीसांनी आरोपी पती यादव आत्माराम राठोड याचे विरूद्ध कलम ३०७, ४९८ भा.दं.वि.अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.