Pages

Saturday 10 December 2011

घाटंजीत रा.कॉ. व कॉंग्रेस मध्ये थेट लढत

सेना भाजप महायुतीचा फुसका बार
नगर परिषदेची निवडणुक आता अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली असुन जाहिर प्रचार थांबला असला तरी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गृहभेटीचा कार्यक्रम मात्र मतदानाची वेळ येईपर्यंत सुरूच राहणार आहे.
कर्णकर्कश आवाजातील प्रचार बंद झाल्यामुळे सर्वसामान्य नागरीक व व्यावसायीकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गेल्या दोन तिन दिवसात सभा, मोटरसायकल रली, पदयात्रा यामुळे प्रचाराला चांगलाच जोर चढला होता. घाटंजी नगर परिषद क्षेत्रात यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस या दोन पक्षातच लढत होण्याची चिन्हे असुन भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या कथित महायुतीला जनता नाकारत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसात आलेल्या अनुभवातुन स्पष्ट होत आहे. जनतेतुन मिळत असलेल्या नकारात्मक प्रतिसादामुळे बेगडी महायुतीचे अवसान गळाले असुन एक दोन विजयाने आपले खाते तरी उघडले जावे अशी प्रार्थना महायुतीचे नेते करीत आहेत. चार प्रभागात बहुतांश ठिकाणी दुहेरी लढत होणार असुन कुठे तिहेरी तर एक दोन ठिकाणी अपक्षांनी कडवे आव्हान दिल्याने चौरंगी लढत रंगणार आहे. या निवडणुकीत आकर्षणाचे केंद्रबिंदु ठरलेल्या जलाराम प्रभाग क्र.१ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या दिग्गज उमेदवारांमध्ये प्रतिष्ठेची लढाई राहणार आहे. येथे ना.मा.प्र. गटात रा.कॉ.चे प्रा. प्रशांत भोरे व कॉंग्रेसचे संदिप बिबेकार यांच्यात थेट लढत असुन सेनेच्या संजय बुल्ले यांच्यासह अपक्ष उमेदवारही आहेत. ना.मा.प्र.स्त्री गटामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संगिता भुरे व कॉंग्रेसच्या स्वाती महाजन यांच्यात स्पर्धा राहिल. स्त्रियांसाठी राखीव गटात रा.कॉ.च्या वत्सला तलमले, कॉंग्रेसच्या रेखा दोनाडकर व सेनेच्या सरोज पडलवार यांच्यात लढत होईल. सर्वसाधारण गटात सर्वाधीक स्पर्धा होणार असुन चुरशीची तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अनुभवी उमेदवार श्याम बेलोरकर, कॉंग्रेसचे परेश कारीया यांच्यात समोरासमोर लढत होणार असुन सेनेचे शैलेश ठाकुर देखील स्पर्धेत आहेत. या प्रभागात राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिल अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
घाटंजीतील सर्वात मोठ्या घाटी प्रभाग क्र.२ मध्ये अनुसूचित जाती गटात कॉंग्रेसचे मधुकर पेटेवार व रा.कॉ.चे दादाराव खोब्रागडे या दोघांमध्ये लढ़त असुन अपक्ष अजय गजभिये यांचीही चर्चा सुरू आहे. या प्रभागात सेना भाजप स्वतंत्रपणे लढत असल्यामुळे भाजपाचे विजय कासार व सेनेचे संतोष शेंद्रे हे दोन उमेदवार एकमेकांविरोधात आहेत. येथिल अनुसूचित जमाती प्रभागातुन रा.कॉ.चे संतोष गेडाम, कॉंग्रेसचे सतिष तोडसाम यांच्यात लढत होईल. सेनेचे दिनेश उईके व भाजपाचे श्रावण परचाके व एक अपक्ष उमेदवार रिंगणात आहे.
ना.मा.प्र.स्त्री गटात राष्ट्रवादीच्या सुधा ठाकरे, कॉंग्रेसच्या अर्चना गोडे व भाजपाच्या माजी नगराध्यक्ष दुर्गा साखरकर यांच्यात लढत आहे. अपक्ष किशोरी चौधरी व सेनेच्या सिता गिनगुले सुद्धा येथुन निवडणुक लढवित आहेत. स्त्रियांसाठी राखीव गटात कॉंग्रेसच्या सिमा डंभारे व रा.कॉ.च्या पुजा दिकुंडवार यांच्यात लढत असुन भाजपाच्या नलु मोहिजे, शिवसेनेच्या सै.सुफिया सै.फिरोज यांच्यासह दोन अपक्ष उमेदवारही निवडणुक लढवित आहेत. स्त्रियांसाठी राखीव गटात सेनेच्या शर्मिला उदार, राष्ट्रवादीच्या सिंधु सिरपुरे, कॉंग्रेसच्या जैनुबाई अफजलखॉ पठाण व भाजपाच्या सुनिता गवारकर यांच्यात लढत होईल. वर्षा जाधव व माजी नगराध्यक्ष माया मंगाम या दोन अपक्ष उमेदवार सुद्धा रिंगणात आहेत.
राममंदिर प्रभाग क्र.३ मध्ये अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथे ना.मा.प्र.स्त्री गटात कॉंग्रेसच्या शोभा ठाकरे या तळागाळातल्या कार्यकर्त्यां असल्यामुळे त्यांना सर्वसामान्य मतदारांची पसंती मिळत आहे. येथे त्यांना सेनेच्या सुलभा खांडरे व रा.कॉ.च्या सारीका उगले यांचे आव्हान राहणार आहे. स्त्रियांसाठी राखीव गटात राष्ट्रवादीच्या निर्मला पांडे व कॉंग्रेसच्या जयश्री दिडशे यांच्यात लढत असुन भाजपाच्या ललिता ठाकुर रिंगणात आहेत. सर्वसाधारण गटात माजी नगराध्यक्ष जगदिश पंजाबी कॉंग्रेस च्या उमेदवारीवर असुन त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमोद मोतीगीर गिरी यांचे कडवे आव्हान राहणार आहे. या गटात अपक्ष उमेदवार संतोष गवळी, म.न.से.चे गजानन भालेकर व भाजपाचे विनायक परचाके देखिल निवडणुक रिंगणात असुन यांना मिळणा-या प्रतिसादावर येथिल निकाल प्रभावीत होऊ शकतो. याच प्रभागातील सर्वसाधारण गटात कॉंग्रेसचे किशोर दावडा व राष्ट्रवादीचे अशोक कटकमवार यांच्यात थेट लढत आहे. येथे रविंद्र ठाकरे हे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रभाग क्र.४ कडे सुद्धा घाटंजीकरांचे लक्ष लागले असुन येथे अनुसूचित जाती स्त्री गटात रा.कॉ.च्या चंद्ररेखा रामटेके व कॉंग्रेसच्या भारती चुनारकर यांच्यात लढत असुन अपक्ष चित्रकला देवतळे व भाजपाच्या शोभा रामटेके निवडणुक लढवित आहेत. अनुसूचित जमाती स्त्री गटात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इंदु परतेकी व कॉंग्रेसच्या शालु गेडाम यांच्यात स्पर्धा आहे. भाजपच्या नंदा कोडापे रिंगणात आहेत. ना.मा.प्र.गटात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राम खांडरे यांचे कॉंग्रेसच्या नरेंद्र धनरे याना कडवे आव्हान असुन भाजपाचे स्वरूप नव्हाते हे देखिल स्पर्धेत आहेत. या प्रभागातील सर्वसाधारण गटात तब्बल सात उमेदवार असुन कॉंग्रेसचे सै.मोहिब सै.लतिफ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अकबर युसूफ तव्वर, स्टॅम्प पेपरवर राजीनामाच लिहुन दिल्यामुळे चर्चेत आलेले अपक्ष उमेदवार मधुकर निस्ताने, भाजपाचे अरविंद बोरकर यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. या गटात सुधिर अग्रहरी, प्रभा शेवरे हे अपक्ष उमेदवार व सुधिर उरकुडे हे मनसेचे उमेदवार सुद्धा रिंगणात आहेत.
जिल्हा परिषद सदस्य सुरेश लोणकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आल्यामुळे रा.कॉ.चे मनोबल वाढले आहे.
साभार:- देशोन्नती

No comments:

Post a Comment