Pages

Friday 16 December 2011

धनादेष अवमान प्रकरणी माजी आमदार पुत्राची निर्दोष सुटका


माजी आमदार स्व.देवरावजी गेडाम यांचे पुत्र आशिष गेडाम यांची धनादेष अवमान प्रकरणी येथिल कनिष्ठ श्रेणी न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. काही महिन्यांपुर्वी त्यांना याच प्रकरणात अटक करण्यात आली होती. फिर्यादी पंकेश वारकड यांनी २००९ मध्ये आशिष गेडाम यांचे विरोधात २ लाख ३० हजार रूपयांचा धनादेष अवमान प्रकरणी खटला दाखल केला होता. आज प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी श्री.सैय्यद यांनी गेडाम यांची निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. महेंद्र ठाकरे, अ‍ॅड. प्रेम राऊत तर फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. गणेश धात्रक यांनी युक्तीवाद केला.



विजेच्या धक्क्याने शेतक-याचा मृत्यू
तालुक्यातील मानोली येथे शेतात काम करत असतांना विजेचा धक्का लागुन शेतक-याचा मृत्यू झाला. सुभाष लक्ष्मण शेंडे असे या शेतक-याचे नाव आहे. शेतात असलेल्या विद्युत खांबाला स्पर्ष झाल्याने त्यातुन वाहात असलेल्या विजप्रवाहामुळे शरीराचा बराचसा भाग भाजल्या गेला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी येथिल शासकीय रूग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विज वितरण कंपनीच्या गलथानपणामुळे सदर शेतक-याला जीव गमवावा लागल्याने त्यांच्या कुटूंबीयांना मदत देण्यात यावी अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment