नगर परिषद निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या आमदार बच्चु कडू यांनी प्रसारमाध्यम व पत्रकारांबाबत केलेल्या अपमानास्पद शेरेबाजीचा घाटंजीतील पत्रकारांनी एकत्रीतपणे निषेध नोंदविला आहे. जाहिर सभेनंतर ते महेश पवार यांच्या निवासस्थानी काही लोकांशी संवाद साधत होते. या दरम्यान बोलतांना त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह शब्दात प्रसारमाध्यमांवर शेरेबाजी केली. यावेळी काही पत्रकारही त्या ठिकाणी उपस्थित होते.
एका लोकप्रतिनिधीने लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर अशाप्रकारे वक्तव्य करणे त्यांच्या पदाला शोभणारे नाही अशा शब्दात घाटंजीतील सर्व पत्रकारांनी अचलपुरचे आमदार बच्चु कडू यांचा निषेध नोंदवुन तहसिलदारांना निवेदन दिले. यावेळी विठ्ठल कांबळे (तालुका प्रतिनिधी, लोकमत), पांडुरंग निवल (तालुका प्रतिनिधी, सकाळ), अमोल राऊत (तालुका प्रतिनिधी, देशोन्नती), चंद्रकांत ढवळे (तालुका प्रतिनिधी, पुण्यनगरी), सुधाकर अक्कलवार (तालुका प्रतिनिधी, दै.भास्कर), महेंद्र देवतळे (शहर प्रतिनिधी, लोकमत), वामन ढवळे (तालुका प्रतिनिधी, मातृभूमी), सैय्यद आसिफ (शहर प्रतिनिधी, हिंदुस्थान), जितेंद्र सहारे (तालुका प्रतिनिधी, जनमाध्यम), डॉ.दिनेश गाऊत्रे (तालुका प्रतिनिधी, दै.दर्शन), लक्ष्मण कानकाटे (प्रतिनिधी, तरूण भारत), भरत ठाकरे (प्रतिनिधी, लोकदुत) यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment