सुरक्षीत प्रवासाची हमी घेणा-या एस.टी. महामंडळाच्या बसमधील अनेक प्रवाशांचा जीव आज मद्यधुंद चालकामुळे टांगणीला लागला होता. आज सायंकाळी ५.४५ वाजता घाटंजी बसस्थानकावरून घाटंजी ते पांढरकवडा बस क्र.९७४० ही बस निघाली. प्रवासादरम्यान चालकाला बस नियंत्रीत होत नसल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले. अनेकदा त्यांनी वाहकाच्या माध्यमातुन चालकाला याबाबत सुचना केल्या. मात्र चालक मद्यधुंद असल्याने बस अनेकदा रस्त्याच्या खालीही उतरली. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. त्यानंतर काही प्रवाशांनी पुढाकार घेत सदर एस.टी.ला साखरा गावाजवळ थांबविले. तसेच घाटंजी बसस्थानक व पांढरकवडा आगाराला या बाबतीत कळविले. माहिती मिळताच पांढरकवडा आगाराचे अधिकारी व कर्मचारी साखरा गावाजवळ अतिरिक्त बस घेऊन आले. प्रवाशांना त्या बसमध्ये रवाना करण्यात आले. मद्यधुंद बसचालक चंदु मडावी याला पुढील कार्यवाहीसाठी घाटंजी येथे आणण्यात येणार असल्याची माहिती आहे. सायंकाळच्या बसफे-यांवरील अनेक चालक वाहक नेहमीच मद्यप्राशन करून असतात अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत. एस.टी. महामंडळाच्या अधिका-यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
अखेर त्या महिलेचा मृत्यू
आर्णी तालुक्यातील केळझरा (कृष्णनगर तांडा) येथिल चंदा यादव राठोड या महिलेची काल (दि.१६) ला रात्री मृत्यूशी झुंज देतांना प्राणज्योत मालवली. दि.१४ डिसेंबरला राहत्या घरी जळाल्यानंतर तिचेवर सेवाग्राम येथे उपचार सुरू होते. पत्नीला जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिचा पती यादव राठोड अटकेत आहे.
साभार:- देशोन्नती

No comments:
Post a Comment