जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांनी साहित्याची तोडफोड केली. या विभागांतर्गत मागासवर्र्गीय विद्यार्थ्यांसाठी खासगी संस्थेमार्फत वसतिगृह चालविले जातात. तेथील विद्यार्थ्यांना नुकतेच गाद्या व इतर साहित्य पुरविण्यात आले. हे साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप मनसेने केला आहे. या प्रकरणी निवेदन देण्यासाठी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे सहकार्यांसह समाजकल्याण विभागात आले. यावेळी त्यांनी समाजकल्याण अधिकारी कुठे आहे, अशी विचारणा केली. तेथील कर्मचार्यांनी साहेब बैठकीला गेले असल्याची माहिती दिली. त्यानंतर लगेच कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खूच्र्यांची व टेबलाची तोडफोड सुरू केली. यावेळी त्यांनी सोबत आणलेल्या गाद्या फाडून त्यातील रुई भिरकावली. त्यानंतर कार्यालयाबाहेर जाऊन सोबत आणलेल्या साहित्याला आग लावली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. या आकस्मिक हल्ल्याने जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष व इतर काही कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागाचे कार्यालय गाठले. साहेब आहेत का अशी विचारणा करुन कार्यालयातील साहित्याची तोडफोड सुरू केली. यात समाजकल्याण अधिकारी अविनाश देवसटवार यांच्या कक्षातील खूच्र्या, टेबल तोडले. कक्षातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून देण्यात आले. त्यानंतर कर्मचार्यांचे टेबल व खूच्र्यांची फेकफाक करण्यात आली. एवढेच नाही तर सोबत आणलेल्या गाद्या फाडून त्यातील रुई कार्यालयात भिरकावली. यानंतर कार्यालयातून बाहेर पडून पटांगणात गाद्या जाळल्या. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे हा धुडगूस सुरू होता.
या प्रकाराची माहिती समाजकल्याण अधिकारी अविनाश देवसटवार यांना कळताच त्यांनी तातडीने कार्यालयात धाव घेतली. मात्र तोपर्यंत मनसेचे कार्यकर्ते निघून गेले होते. घटनेची माहिती पोलिसांना व वरिष्ठ अधिकार्यांना देण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक ठाकरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दीपक केदार यांनी घटनास्थळाला भेट दिली. वडगाव रोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सज्रेराव गायकवाड यांनीही पोलीस कुमकासह घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
शासन जबाबदार नाही - ना. शिवाजीराव मोघे
समाज कल्याण विभागांतर्गत खासगी संस्थेमार्फत वसतिगृह चालविल्या जाते. वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आहारासाठी शासनातर्फे संस्थांना अनुदान दिल्या जाते. साहित्य खरेदी आणि निविदा या प्रक्रियेला शासन जबाबदार नसल्याची प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिली.
हल्ले सहन करणार नाही - सीईओ राम
न्याय मागण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध असताना त्याचा वापर न करता गुंडागर्दी करुन अधिकारी व कर्मचार्यांवर होणारे हल्ले सहन केले जाणार नाही. एकदाही तक्रार किंवा माहिती न देता थेट तोडफोड करण्याची ही पद्धत अत्यंत चुकीची आहे, अशी प्रतिक्रिया सीईओ नवलकिशोर राम यांनी दिली.
खरेदी राज्यस्तरावरून - अविनाश देवसटवार
वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पुरविण्यात आलेल्या गाद्यांचे कंत्राट राज्यस्तरावरुन देण्यात आले आहे. यात जिल्हा परिषद समाजकल्याण कार्यालयाचा काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया समाजकल्याण अधिकारी अविनाश देवसटवार यांनी दिली.
साभार :- लोकमत
No comments:
Post a Comment