हयगय झाल्यास जिल्हाधिका-यांवर कार्यवाही
मुख्य सचिवांचे सक्त निर्देश
महाराष्ट्र विधानमंडळाच्या आजी-माजी सदस्यांचे निधन झाल्यास त्याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने विधानमंडळ सचिवालयास कळवावी असे सक्त आदेश राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी दिले आहेत. याबाबत हयगय झाल्यास थेट मुख्य सचिवांच्या स्तरावर जिल्हाधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कार्यवाही केली जाणार आहे. विधीमंडळाच्या आजी-माजी सदस्याचे निधन झाल्यास शोक प्रस्ताव सभागृहात मांडण्यात येतो. मात्र अनेकदा माहीती वेळेवर पोहचत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता सदस्यांच्या निधनाची माहीती अधिवेशन चालु असतांना २४ तासांच्या आत व ईतर वेळी १५ दिवसांच्या आत विधीमंडळ सचिवालयाला कळवावी लागणार आहे. यापुर्वीही अनेकदा याबाबत आदेश देण्यात आले होते. मात्र अनेक जिल्हाधिकारी कार्यालयांकडून त्याचे पालन होत नसल्याने २४ डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे प्रशासनाने याबाबत कठोर धोरण अवलंबून निधनाची माहिती वेळेवर न पोहचल्यास संबंधीत जिल्हाधिका-यांना व्यक्तीश: जबाबदार धरण्यात येणार आहे. निधन झालेल्या आजी-माजी सदस्याची संपुर्ण माहिती, त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचे नाव व पत्ता असा तपशील कळविण्यात यावा असे सक्त निर्देश मुख्य सचिवांनी निर्गमीत केले आहेत.
बियर बारमध्ये २० हजारांची चोरी
येथिल तहसिल समोर असलेल्या समाधान बियर बार मध्ये काल रात्री अज्ञात चोरट्याने शटरचे कुलूप फोडून २० हजार रूपये रोख लंपास केले. फिर्यादी विक्रम घनश्याम जयस्वाल यांच्या तक्रारीवरून घाटंजी पोलीसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असुन तपास सुरू आहे.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment