तालुक्यातील ससाणी येथे पर्यावरण मंत्रालय भारत सरकार, बायफ पुणे, नवचैतन्य बहुउद्देशीय विकास युवा मंडळ शिरोली व जिल्हा परिषद उच्च प्राथमीक मराठी शाळा ससाणी याच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जि.प. शाळेच्या आवारातून पदयात्रेला सुरूवात झाली. संपुर्ण गावात या पदयात्रेच्या माध्यमातून पर्यावरणाच्या महत्वाविषयी ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्याथ्र्यांना झाडांची रोपटी दत्तक देण्यात आली. या कार्यक्रमाला घाटंजी केंद्राचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी (बायफ मित्र) संजय बाभुळकर, गुलाब शिसले, राहुल जिवने यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश गायकवाड होते. तर माधव कातकडे, प्रमोद ढवळे, संजय काळे, आर.बी.गोलाईत यांची प्रमुख उपस्थिती होती. ससाणी शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एस.डोमाळे यांचे या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले. संचालन बि.एन.राठोड तर आभार प्रदर्शन रूपेश बेलसरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रविण सहारे, प्रफुल्ल राऊत, तुषार सिसले, जिव्हाळा मित्र मंडळाचे मिलींद लोहकरे यांनी परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment