शिवणी गट ठरतोय दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेचा
नामांकन दाखल करण्याच्या तिस-या दिवशी जि.प.व पं.स. साठी १२ उमेदवारानी नामांकन अर्ज दाखल केले.
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस साठी ही निवडणुक प्रतिष्ठेची झाली असल्याने नामांकन दाखल करतांना दोन्ही पक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आज दाखल झालेल्या नामांकनामध्ये पारवा जि.प.गटातून अयनुद्दीन सोलंकी, मधुसूदन मोहुर्ले, सुहास देशमुख, पारवा गणातून स्नेहा खडसे, कुर्ली गणातून नितीन नार्लावार, अयनुद्दीन सोलंकी, पार्डी गटातून मंदा डंभारे, पार्डी गणातून छाया सहदेव राठोड, शिवणी गटातून सुरेशबाबू लोणकर, देवानंद पवार, शिवणी गणातून संजय आडे, मानोली गणातून सिंधु मेश्राम यांचा समावेश आहे.
नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुमारे पाच हजार कार्यकर्त्यांसह भव्य रॅली काढ़ली होती. या रॅलीमध्ये माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, जि.प.सदस्य सुरेश लोणकर, बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे, भुविकास बँकेचे अध्यक्ष शंकर ठाकरे, रमेश लोणकर, मारोती पवार यांचेसह नगर परिषद, पंचायत समिती, खरेदी विक्री संघ, बाजार समितीचे पदाधिकारी व सदस्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तर कॉंग्रेसच्या रॅलीमध्ये सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, योगेश पारवेकर, नगराध्यक्ष जगदिश पंजाबी, सुभाष गोडे, परेश कारीया, सुधाकर अक्कलवार यांचेसह पंचायत समिती, नगर परिषदेतील पदाधिकारी व सदस्यांसह सुमारे दोन हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते.
ग्रामिण भागातून मोठ्या प्रमाणात नागरीक आल्याने तहसिल कार्यालय परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
No comments:
Post a Comment