नगर परिषद अध्यक्षपदाच्या आज झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे किशोर दावडा यांची बिनविरोध निवड झाली. एक वर्ष नगराध्यक्षपद सांभाळुन जगदिश पंजाबी यानी राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले होते. घाटंजी नगर परिषदेमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये आघाडी आहे. सत्तास्थापनेच्या वेळी झालेल्या करारानुसार जगदिश पंजाबी एक वर्ष, किशोर दावडा सहा महिने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राम खांडरे एक वर्ष व त्यानंतरच्या अडीच वर्षासाठी आरक्षणानुसार नगराध्यक्ष निवडण्यात येणार आहे. घाटंजी नगरपरिषदेमध्ये कॉंग्रेस ८, राष्ट्रवादी ४ तर शिवसेना ५ नगरसेवक असे पक्षीय बलाबल आहे. सुरूवातीचे अडीच वर्ष नगराध्यक्षपद खुले आहे. तर त्यानंतर अनुसूचित जाती (महिला) करीता आरक्षण निघाले आहे. त्यामुळे कॉंग्रेस रा.कॉं.आघाडीमध्ये एकमेव असलेल्या चंद्ररेखा रामटेके यांचेकडेच नगराध्यक्षपद येणार आहे.
आज झालेल्या निवडणुक प्रक्रीयेत सेनेचे संतोष शेंद्रे यानीही नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र किशोर दावडा यानी केलेल्या विनंतीनुसार अर्ज मागे घेऊन बिनविरोध निवड करण्यात आली असे शेंद्रे यानी सांगितले.
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन उपविभागीय अधिकारी प्रेरणा देशभ्रतार व मुख्याधिकारी गिरिष बन्नोरे यानी काम पाहिले.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment