Pages

Friday 18 January 2013

हलकं फुलकं: 'सोनियाजी आ रही है' म्हणजे ‍कमिंग इलेक्शन ?


देशात राजकीय पक्षांपासून सर्वांनाच सध्या लोकसभा निवडणुकांचे वेध लागले असताना गूगलाही ते लागल्याचे दिसत आहे. त्यामुळेच 'सोनियाजी आ रही', असे टाईप केल्यास त्याचे इंग्रजी भाषांतर 'कमिंग इलेक्शन' असे येते. एकदा तरी तपासून बघाच तुम्ही गूगलचा हा पराक्रम. 
गूगल हे असे काही माहितीचे जाळे आहे, की त्याच्या पोटात काय दडले याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात गूगलचे फार मोठे स्थानही आहे. जे कुठेही शोधून सापडत नही ते गूगलवर हमखास सापडते, असा गूगलचा खाक्या आहे, पण शेवटी म्हणतात ना! जे पेरणार तेच उगवणार. संगणक आणि वेबसाइटचेही तसेच आहे.

'ट्विटस्'च्या वाचनाने होते वजन कमी

सध्याची पिढी आपण कसे दिसतो, कसे राहतो, वाढते वजन याबद्दल चांगलीच 'कॉन्शिअस' असते. त्यासाठी काय करता येईल, असा सारखा विचार करताना 'गूगल सर्च' होणार नाही, असे शक्यच नाही. शिवाय आजकाल 'सोशल नेटवर्किंग साइट'वरही अनेक ठिकाणी 'हेल्थ टिप्स' नुसत्या वाचूनच आता तुमचे वजन कमी होणार आहे. आश्चर्य वाटते, परंतु संशोधकांनी हाच दावा एका नव्या संशोधनात केला आहे. 
'युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅरोलिना'च्या अर्नाल्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ' ने हा ट्विटरवरील वजन कमी करण्याच्या पोस्ट वाचल्यानेच वजन कमी होत असल्याचे म्हटले आहे.
साभार:- मराठी वेबदुनिया 

No comments:

Post a Comment