अयनुद्दीन सोलंकी यांची मागणी
पांढरकवडा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत घाटंजी तालुक्यातील पारवा वनपरिक्षेत्राच्या हद्दीत माणुसधरी येथे रोजगार हमी योजनेची कामे न करता मोहदा पोष्टातून रक्कम काढुन अपहार केल्या प्रकरणी संबधीतांवर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशी तक्रार कुर्लीचे सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांनी केली आहे.
रोहयो अंतर्गत माणुसधरी येथे कामे करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात माणुसधरी येथे कुर्ली येथिल मजुरांनी कोणतीही कामे केली नसल्याचे बयाणात मजुरांनी कबुल केले आहे. जिल्हा परिषद रोहयो कक्षाचे गटविकास अधिकारी पठारे यांनी केलेल्या चौकशीत मिरा मोहुर्ले, नामदेव मोहुर्ले, पार्वता पुसनाके, अनुसया गुरनुले, कर्णु तोडसाम, अनिता मोहुर्ले, दिनेश गुरनुले यांनी रोहयोच्या कोणत्याही कामावर मजुरीचे काम केले नाही व आमचे पैसे मोहदा पोस्ट ऑफिसमध्ये कसे काय आहे? असे चौकशी दरम्यान नमुद केल्याचे सोलंकी यांनी तक्रारीत म्हटले आहे. उल्लेखनीय म्हणजे पोस्टाच्या विड्रॉल स्लिपवर साक्षीदार म्हणुन सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांची खोटी स्वाक्षरी संबंधीत ठेकेदार अथवा त्यांच्या सहका-यांनी केली असल्याचा आरोप करून त्याची हस्ताक्षर तज्ञामार्पâत तपासणी करण्याची मागणी सोलंकी यांनी केली आहे.
पांढरकवडा वनविभागामार्फत माणुसधरी येथे रोहयोचे काम झाले नाही. परंतु उपवनसंरक्षक, पांढरकवडा, नितीन कांबळे, किसन जाधव, मंगेश ताटकंडवार, पोस्ट मास्तर मोहदा, वनपरिक्षेत्र अधिकारी पारवा, तहसिलदार घाटंजी, गटविकास अधिकारी पं.स.घाटंजी, यांनी संगनमत करून मजुरीच्या पैशाची उचल करून रकमेचा अपहार केल्याने त्यांचेविरूद्ध फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अन्यथा याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे सोलंकी यांनी म्हटले आहे.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment