तालुक्यातील सायतखर्डा येथे दारूबंदी अभियानाची सुरूवात करण्यात आली. गावातील संपुर्ण महिलावर्ग व तांटामुक्त गाव समितीच्या वतीने नुकतेच या विषयावर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. गावात संपुर्णपणे दारूबंदी करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच गजानन शेंडे होते. सामाजीक कार्यकर्ते मधुकर निस्ताने व मोरेश्वर वातिले यांनी यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन केले. दारूबंदी अभियान गावात राबविण्यासाठी पं.स.उपसभापती सुवर्णा निकोडे, पोलीस पाटील प्रभाकर देशमुख, गावातील सर्व महिला बचत गट, ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, गावातील तरूण वर्ग, भजनी मंडळे व प्रतिष्ठीत नागरिकांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष गजानन लेनगुरे यांनी केले. तर संचालन व आभार प्रदर्शन राजेंद्र गोबाडे यांनी केले.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment