मानोली येथिल तिन शालेय विद्यार्थ्यांचा १६ डिसेंबर रोजी विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रविण देशमुख यांनी मोहुर्ले व निकोडे परिवाराच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच आपल्या परिने शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांचेसमवेत शिक्षण सभापती मनमोहनसिंग चव्हाण, रा.कॉ.चे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर, उपशिक्षणाधिकारी वा.ल. मोतीकर, बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे, उपसभापती प्रकाश डंभारे हे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मिळणारी अपघात विम्याची रक्कम शक्य तितक्या लवकर देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी देशमुख यांनी सांगितले
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment