सध्याच्या काळात माणुसकीचाही भाव लागत आहे. कुठे अपघात झाला तर त्यामध्ये मृत्युमूखी पडलेल्यांच्या व्यक्तीमत्वानुसार कुणाचा एक लाखाचा तर कुणाचा दिड लाखांचा भाव लागतो. जर कुणी अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रातील असेल तर चार पाच लाखांचा भाव लागतो. एवंâदरीतच आता माणसाचा भाव कमी होत चाललाय असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाचे न्यायमुर्ती एम.एन.गिलानी यांनी केले. येथिल सोनु मंगलम मध्ये आयोजीत कायदेविषयक समस्यांवर मार्गदर्शन शिबिरात ते उद्घाटक म्हणुन बोलत होते.
माणुस जेव्हा व्यावहारीक वागत नाही व जिथे अधर्म शिरतो तेव्हा वाद निर्माण होतात. कौटूंबिक वाद जेव्हा विकोपाला जातात तेव्हा नाते संबध तुटल्या जातात. स्त्रियांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहेत. बलात्कार, हुंडाबळी, नव-याकडून प्रताडना यासह वेगवेगळ्या माध्यमातुन स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे आपण संगणकाच्या युगात वावरतो आहोत का असा प्रश्न निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर पांढरकवडा येथिल जिल्हा व सत्र न्यायाधिश १ न्या.व्ही.एस.पाटील, बार काऊन्सील ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवा चे सदस्य आशिष देशमुख, जिल्हा विधी समिती, तालुका न्यायालय घाटंजीचे अध्यक्ष न्या.तेजवंतसिंघ संधु, तहसिलदार प्रकाश राऊत, मुख्याधिकारी गिरिष बन्नोरे, गटविकास अधिकारी अजय राठोड, तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड विजय भुरे, जेष्ठ विधिज्ञ अॅड आर. के. मनक्षे, अॅड, भैय्यासाहेब उपलेंचवार, अॅड सुरेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक घाटंजी न्यायालयाचे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी तेजवंतसिंघ संधु यांनी केले. संचालन सरकारी वकील अॅड संजय राऊत तर आभार प्रदर्शन अॅड विजय भुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस.आर.तांबोळी, वकील संघाचे सचिव अॅड मनोज राठोड, अॅड अनंत पांडे, अॅड विनय चव्हाण, अॅड नेताजी राऊत, अॅड निलेश शुक्ला, अॅड निलेश चवरडोल, अॅड प्रेम राऊत, अॅड चंद्रकांत मरगडे, अॅड अनुपमा दाते यांनी परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment