येथिल शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा संचालीत शि.प्र.मं.कन्या शाळेच्या विद्यार्थीनींनी यवतमाळ येथे झालेल्या ३१ व्या राज्यस्तरीय शुटींगबॉल स्पर्धेत सबज्युनियर व ज्युनियर गटात क्रमश: प्रथम व द्वितीय स्थान पटकावले.
शाळेच्या विद्यार्थीनी अनुराधा र.निवल, मंजुषा सु.वखरे, रजनी प्र.वातीले, मयुरी प्र.वातीले, निकिता सु.गावंडे, काजल उ.राठोड, यांनी आपल्या संघाकडून खेळतांना उत्कृष्ट प्रदर्शन केले व वैय्यक्तीक खेळाच्या जोरावर आपल्या संघाला प्रथम व द्वितीय स्थान मिळवुन देण्यात मोलाची कामगिरी बजावली.
यवतमाळ जिल्ह्याला सबज्युनियर गटात प्रथम तर ज्युनियर गटात द्वितीय स्थान मिळाले. या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष एस.ए.गिलानी, उपाध्यक्ष संजय गढीया, अॅड.अनिरूद्ध लोणकर, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब जुमनाके, मुख्याध्यापीका संध्या कासलिकर, पर्यवेक्षक द.तु.जमदापुरे यांचेसह शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी वृंदाने या विद्यार्थीनींचे कौतुक केले आहे. या सर्व विद्यार्थीनींना शाळेच्या शारिरीक शिक्षण मार्गदर्शक शिक्षीका कु. केकापुरे व सहाय्यक शिक्षक अतुल ठाकरे यांचे मार्गदर्शन मिळाले.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment