ले-आऊट मध्ये अडसर ठरत असलेले घाटंजी नगर परिषदेचे सार्वजनिक शौचालयच ले-आऊट धारकांनी पाडण्यास सुरूवात केल्याने न.प.प्रशासनाचा वचक नसल्याचे दिसुन येत आहे. काही नागरिकांनी ही बाब नगर परिषदेच्या निदर्शनास आणुन दिल्यानंतर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांनी ले-आऊट धारक राजीव राधामोहन बजाज, प्रदिप पुरूषोत्तम लोयलका, वर्षा राजेश ठाकुर यांना थातुर मातूर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
येथिल शेत सव्र्हे क्रं.५५/२ मध्ये या भागातील रहिवाशांसाठी अनेक वर्षांपुर्वी नगर परिषदेने सार्वजनिक शौचालय बांधलेले आहे. परिसरातील सर्वसामान्य नागरिक त्याचा उपयोगही करतात. या शौचालयाच्या मागील बाजुस असलेल्या शेतात ले-आऊट झाले आहे. या सार्वजनिक शौचालयामुळे प्लॉटचे भाव अपेक्षेप्रमाणे मिळणार नाहीत या उद्देशाने सदर ले-आऊटधारकांनी कोणताही विचार न करता शौचालयाचे बांधकाम पाडायला सुरूवात केली. सुमारे १० वर्षांपुर्वी तत्कालीन न.प.पदाधिका-यानी ले-आऊटधारकासोबत हे शौचालय पाडून दुस-या जागेवर दहा शौचालये बांधुन देण्याचा करार केला होता असे ले-आऊटधारकाचे म्हणणे आहे.
मात्र दहा वर्षांपुर्वी केलेल्या तथाकथित कराराची अंमलबजावणी आजवर का केली नाही? तसेच न.प.ची मालमत्ता असलेल्या बांधकामाला पाडण्याचा अधिकार खासगी व्यक्तीला आहे का? असे प्रश्न उपस्थित केल्या जात आहेत.
मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे यांनी सदर ले-आऊटधारकांवर फौजदारी अथवा दंडात्मक कार्यवाही न करता थातुर मातूर कारणे दाखवा नोटीस बजावून औपचारीकता पुर्ण केली असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एवंâदरीतच नियमबाह्य होत असलेल्या कामांवर नगर परिषद प्रशासनाचे लक्ष नसुन सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीतच नियमांवर बोट ठेवुन काम केल्या जात असल्याची ओरड होत आहे.
No comments:
Post a Comment