येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किशोर खडसे यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचतप प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक ए. डी. जहरवाल यांनी गुरुवारी अटक केली.
घाटंजी तालुक्यात एकूण ४ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. यापैकी रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. संजय पुराम कार्यरत आहेत. या चारही केंद्रावर देखरेख करण्याकसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किशोर खडसे पाच वर्षांपासून कार्यरत आहेत. रुग्णांच्या सोयी सुविधेसाठी दोन समित्या असतात. त्यापैकी एक नियामक मंडळ व दुसरी कार्यकारी समिती असते. या समितीवर अध्यक्ष तालुका आरोग्य अधिकारी तर सचिव संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी असतात. इंडियन पब्लिक हेल्थ स्टॅण्डर्डचा निधी अध्यक्ष व सचिव यांच्या संयुक्त सहीने धनादेशाद्वारे वटविला जातो. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढविणे, रंगरंगोटी करणे, मेडिकेअर आणि गॅसेस, अंगणवाडी, कार्यशाळा, वैद्यकीय कामासाठी कपडे खरेदी व शिलाई इत्यादी कामे होत असतात. रामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले डॉ. संजय पुराम यांनी आयपीएचएस अंतर्गत येणार्या निधीमधून १ लाख 0३ हजार ६८३ रुपये ३0 मार्चपर्यंत खर्च केले. हा खर्च केलेल्या रकमेच्या १0 टक्के रक्कम कमीशन म्हणून तालुका आरोग्य अधिकारी के. एन. खडसे यांनी मागितले.
नेहमीच्या त्रासाला कंटाळून डॉ. पुराम यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्या अनुषंगाने गुरुवारी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात असताना डॉ. पुराम यांच्याकडून ५000 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment