Pages

Saturday 1 October 2011

साखरा जि.प.शाळेत ५ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा


तालुक्यातील साखरा जिल्हा परिषद शाळेतील पाच विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाल्याची घटना घडल्याने पालकांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज दुपारी शाळेत खिचडी खाल्ल्यानंतर काही वेळातच या पाच विद्यार्थ्यांना मळमळु लागले. ओका-या झाल्याने या चिमुकल्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यानंतर तिन विद्यार्थ्यांना घाटंजी येथिल ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर दोन विद्यार्थ्यांना खासगी डॉक्टरकडे नेण्यात आले. सागर किसन राठोड (वर्ग ३ रा), लखन इंद्रजित राठोड (वर्ग २ रा) , संदेश विलास राठोड (वर्ग २ रा), राहुल विष्णु दंडांजे (वर्ग ४ था), सुशिल सदानंद शिसले (वर्ग २ रा) असे विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. यातील तिन विद्यार्थ्यांवर ग्रामिण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या शाळेत नेहमीच निकृष्ट दर्जाची खिचडी देण्यात येत होती तसेच खिचडीतुन अनेकदा अळ्या निघत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी करीत होते. मात्र संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पं.स. सदस्य सहदेव राठोड, प्रभारी गटविकास अधिकारी अजय राठोड, गटशिक्षणाधिकारी जुमनाके यांनी रूग्णालयात जाऊन या विद्यार्थ्यांची विचारपुस केली.

No comments:

Post a Comment