Pages

Monday, 24 October 2011

आता आम्हाला शैक्षणीक कामे करू द्या..!


शेकडो शिक्षकांचे तहसिलदारांना निवेदन

ऐन परिक्षेच्या काळात शिक्षकांवर मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सोपविण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेकडो शिक्षकांनी तहसिल कार्यालयावर धडक दिली. शैक्षणीक कामावर दुर्लक्ष होत असल्याने मतदार याद्यांच्या कामावर सामुहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद व नगर परिषदेचे शेकडो शिक्षक उपस्थित होते. बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यान्वये शिक्षकांना जनगणना, आपत्ती निवारण, तसेच निवडणुकीच्या कामाव्यतिरीक्त इतर कामे दिल्या जाऊ नयेत असा स्पष्ट नियम आहे. तरी देखिल शिक्षकांनी गेल्या महिनाभरात मतदार याद्यांच्या कामात प्रशासनाच्या आदेशाचे पालन केले आहे. मात्र नुकत्याच देण्यात आलेल्या नविन आदेशान्वये नगर परिषद क्षेत्रातील मतदार याद्या अद्ययावत करणे, मतदारांचे छायाचित्र गोळा करणे हे काम शिक्षकांना देण्यात आले आहे. १ नोव्हेंबर पर्यंत ते पुर्णत्वास न्यायचे आहे. मात्र सध्या शिक्षकांवर प्रथम सत्रांत परिक्षेच्या प्रश्नपत्रिका तपासणे व सातत्यपुर्ण सर्वंकष मुल्यमापन पद्धतीनुसार विद्याथ्र्यांचे मुल्यमापन करण्याची जबाबदारी आहे. या सर्व कामांसाठी शिक्षकांना शाळेत राहणे मुख्याध्यापकांनी बंधनकारक केले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या आदेशाचे पालन करणे अशक्य असल्याचे शिक्षकांचे म्हणने आहे. एकीकडे शासन सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करते तर दुसरीकडे शिक्षकांना अशैक्षणीक कामाना जुंपून शिक्षणाच्या कार्यापासुन वंचित ठेवते याबाबत अनेक शिक्षकांनी आपली नाराजी व्यक्त केली.


शिक्षकांच्या प्रशिक्षणात उडाला गोंधळ

अंजी नृसिंह येथे झालेल्या तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या मुल्यमापन प्रशिक्षणात अखेरच्या दिवशी गोंधळ उडाला. या तिन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमासाठी येणा-या शिक्षकांना प्रत्येक दिवसाचा प्रवास भत्ता देय होता. मात्र पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने पैसे मिळाल्याबाबत शिक्षकांच्या स्वाक्षNया घेतल्या. मात्र पैशांचे वाटप केले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या काही शिक्षकांनी याबाबत संबंधीतांना विचारणा केली. परंतु त्यानी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सदर बाबीची तक्रार करणार असल्याचेही काही शिक्षकांनी बोलुन दाखविले.


No comments:

Post a Comment