सहदेव राठोड यांची मागणी
देशात सध्या राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी येथिल पंचायत समिती सदस्य सहदेव राठोड यांनी केली आहे. महाराष्ट्रात १९७३ साली भिषण दुष्काळ पडला असतांना तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी मागेल त्याला काम या तत्वावर हि योजना सुरू केली होती. दुष्काळाच्या काळात उदरनिर्वाहासाठी ही योजना अतिशय प्रभावी ठरली होती. महाराष्ट्रापासुन प्रेरणा घेऊन ही योजना सध्या देशभरात राबविण्यात येत आहे. या योजनेचे जन्मदाते वसंतराव नाईक असल्याने त्यांचेच नाव या योजनेला देणे अधिक संयुक्तीक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेत्यांनी यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी सहदेव राठोड यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment