Pages

Showing posts with label सहदेव राठोड. Show all posts
Showing posts with label सहदेव राठोड. Show all posts

Saturday, 13 October 2012

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी सहदेव राठोड


जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी घाटंजी पंचायत समितीचे माजी सदस्य सहदेव राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री ना. मनोहर नाईक, आमदार संदिप बाजोरीया, जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर यांच्या उपस्थितीत राठोड यांची या पदावर सर्वानुमते नेमणुक करण्यात आली. राठोड यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांचेसह सर्व जेष्ठ नेत्यांना दिले आहे.
यापुर्वी त्यानी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी कार्य केले असुन एक अभ्यासु पंचायत समिती सदस्य अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या नियुक्तीचे बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे, उपसभापती प्रकाश डंभारे, अमोल कोटरंगे, दिलीप मडावी यांचेसह तालुक्यातील कार्यकत्र्यांनी स्वागत केले आहे. या पदाच्या माध्यमातुन राष्ट्रवादी कॉंग्रेसला ग्रामिण भागातील तळागाळातल्या माणसापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार असुन पक्ष नेतृत्वाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणार असल्याची प्रतिक्रीया सहदेव राठोड यांनी दिली.
साभार :- देशोन्नती  

Saturday, 1 October 2011

रो.ह.यो.ला वसंतराव नाईकांचे नाव द्या

सहदेव राठोड यांची मागणी
देशात सध्या राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी येथिल पंचायत समिती सदस्य सहदेव राठोड यांनी केली आहे. महाराष्ट्रात १९७३ साली भिषण दुष्काळ पडला असतांना तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी मागेल त्याला काम या तत्वावर  हि योजना सुरू केली होती. दुष्काळाच्या काळात उदरनिर्वाहासाठी ही योजना अतिशय प्रभावी ठरली होती. महाराष्ट्रापासुन प्रेरणा घेऊन ही योजना सध्या देशभरात राबविण्यात येत आहे. या योजनेचे जन्मदाते वसंतराव नाईक असल्याने त्यांचेच नाव या योजनेला देणे अधिक संयुक्तीक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेत्यांनी यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी सहदेव राठोड यांनी केली आहे.