देशोन्नतीचे कार्यकारी संचालक ऋषीकेश पोहरे यांच्यावर असामाजीक तत्वांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा घाटंजी तालुक्यातील पत्रकारांनी तिव्र निषेध नोंदविला. स्थानिक विश्राम भवनात जेष्ठ पत्रकार विठ्ठलराव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत पत्रकारांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांबाबत तिव्र संताप व्यक्त करण्यात आला. शासनाने पत्रकार हल्ला विरोधी कायदा त्वरीत मंजुर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. ऋषीकेश पोहरे यांच्यावर हल्ला करणा-या आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी या मागणीचे निवेदन घाटंजीचे तहसिलदार संतोष शिंदे यांना देण्यात आले. यावेळी लोकमतचे तालुका प्रतिनिधी विठ्ठलराव कांबळे, सकाळचे तालुका प्रतिनिधी पांडुरंग निवल, देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी अमोल राऊत, लोकशाही वार्ताचे तालुका प्रतिनिधी चंद्रकांत ढवळे, पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी राजू चव्हाण, लोकमतचे शहर प्रतिनिधी महेंद्र देवतळे, लोकमतचे प्रतिनिधी सुधाकर अक्कलवार, मातृभूमीचे तालुका प्रतिनिधी वामनराव ढवळे, साप्ताहीक अंकुरचे संपादक बाळासाहेब ठाकरे, हिंदुस्थानचे शहर प्रतिनिधी सैय्यद आसिफ, जनमाध्यमचे तालुका प्रतिनिधी जितेश सहारे, साहसिकचे तालुका प्रतिनिधी वैभव जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment