
त्यांच्या मागे पती, मुलगा यश व मोठा आप्त परिवार आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे दिवंगत आमदार नीलेश देशमुख पारवेकर यांच्या त्या भावसून होत्या. अवघ्या दोन महिन्यापुर्वी २७ जानेवारीला आमदार निलेश पारवेकर यांचे अपघाती निधन झाले होते. या दु:खातून पारवेकर परीवार सावरत नाही तोच सौ.श्वेता यांच्या आकस्मिक निधनाने कुटूंबाला दुसरा धक्का बसला आहे. होळीच्या दिवशी व रंगपंचमीच्या पुर्वसंध्येला घडलेल्या या दु:खद घटनेने संपुर्ण घाटंजी तालुक्यात शोककळा पसरली आहे.
No comments:
Post a Comment