तालुक्यातील सायतखर्डा तंटामुक्त गाव समितीच्या वतीने नुकताच गावातील गुणवंत विद्यार्थी, महिला बचत गट, व्यसन मुक्त व्यक्ती, तंटामुक्तीसाठी मोलाचे कार्य करणारे नागरीक तसेच ईतर क्षेत्रात नैपुण्य प्राप्त
करणा-या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. सायतखर्डा गावाला नुकताच तंटामुक्तीसाठी ३ लाख रूपयांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यासाठी तंटामुक्तीचे अध्यक्ष गजानन लेनगुरे व पोलीस पाटील प्रभाकर देशमुख यांचे भरीव योगदान आहे. त्यामुळे याप्रसंगी त्यांचाही शाल श्रीफळ देऊन सरपंच गजानन शेंडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र गोबाडे यांनी केले. या सत्कार सोहळ्याला शाळा व्यवस्थापन समिती, तंटामुक्त गाव समिती, ग्रा.पं. सरपंच, सचिव व सदस्य, महिला बचत गट, शिक्षक वृंद व नागरीकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.