Pages

Friday 19 August 2011

अण्णा हजारेंच्या उपोषणाला घाटंजी तालुक्यात व्यापक पाठींबा




कठोर जनलोकपाल विधेयक मंजुरीसाठी अण्णा हजारेंच्या उपोषणाला ग्रामिण भागातही व्यापक पाठींबा मिळत आहे. घाटंजी शहरात विविध आंदोलनांनी वातावरण अण्णामय झाले आहे.
काल (दि.१८) रात्री येथिल पोलीस स्टेशन चौकातुन निघालेल्या युवा मशाल रॅली मध्ये हजारो युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरीक, सामाजीक कार्यकर्ते अशा सुमारे दोन हजार नागरीकांची अभुतपुर्व रॅली शहरातुन निघाली. हातात धगधगणा-या मशाली, राष्ट्रध्वज व डोक्यावर 'मी अण्णा हजारे' ची टोपी घालुन अनेकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. सोनिया गांधी, मनमोहन सिंग, कपिल सिबल, मनिष तिवारी यांचे विरोधात प्रचंड घोषणाबाजीने परीसर दणाणुन गेला होता. आज सकाळी ११.३० दरम्यान शहरातुन मोटरसायकल रॅली काढण्यात आली. शेकडो तरूणांनी यामध्ये सहभाग घेतला.
त्यानंतर ऑटो, रिक्शा, प्रवासी वाहने, मालवाहु वाहने यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. शेकडो वाहनधारकांनी यामध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गेल्या काही दिवसांपासुन तालुक्यात अण्णा हजारे व लोकपाल विधेयकाचीच चर्चा सुरू आहे.

No comments:

Post a Comment