देशभर चर्चेचा विषय ठरलेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाला घाटंजी तालुक्यात व्यापक प्रतिसाद मिळत आहे. शहरातील ऑटोचालक, मालवाहु वाहनधारक तसेच प्रवासी वाहतुकदारांनी भव्य रॅली काढली. शेकडो वाहनधारक आपल्या व्यवसायाला विराम देऊन या रॅली मध्ये सहभागी झाले होते. तसेच लॉयनेस क्लब, एकता महिला मंडळ, वसंत नगर महिला मंडळ, एकता महिला संस्कार कलश योजना या महिला मंडळातील महिलांनी जनलोकपाल विधेयकाच्या समर्थनासाठी येथिल हुतात्मा स्मारकाजवळ निदर्शने केली. त्यानंतर शहरातुन मोर्चा काढण्यात आला. अनेक महिलांनी यामध्ये सहभाग घेऊन अण्णा हजारेंच्या आंदोलनाला पाठींबा दर्शविला.
या आंदोलनात अॅड.अनुपमा दाते, मंगला कटकोजवार, सौ.काकडे, कला जोगे, मृदूला आडे, संध्या उपलेंचवार, माया कटकमवार, साधना ठाकरे, संगिता भुरे, वैशाली वाघ, सविता मानकर, मेघा गोमेकर, प्रभा काशेट्टीवार, ज्योती काशेट्टीवार, सिमा ठाकरे, केशरी विठाळकर, वृशाली बेले, साधना काशेट्टीवार, शोभा कुपटेकर, वंदना अवचित, अर्चना उपलेंचवार, सुगंधा पुराणीक, प्रिती अंजीकर, मिनाक्षी जकाते, सुनिता निस्ताने, मंजुळा पेंदाम, शारदा मैंद, ललिता लिंगनवार, लता नखाते, वंदना गंधारे, माया यमसनवार, दर्शना उत्तरवार, संध्या भांडारवार, शामल पडगिलवार, वर्षा माडुरवार, स्मिता नार्लावार, साधना पडगिलवार, शोभा कुपटेकर यांचेसह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.
आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास गिलानी महाविद्यालय, शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था तसेच ईतर शैक्षणीक संस्थांच्या विद्यार्थांनी शहरातुन भव्य रॅली काढली. अनेक विद्यार्थी भ्रष्टाचाराच्या विरोधात एकत्र आल्याने शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
No comments:
Post a Comment