
सामाजीक संस्थांचा पुढाकार : मार्गदर्शन कार्यशाळा व प्रचार रॅली
अलीकडच्या काळात पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून नववर्षाचे स्वागत करण्याची विभत्स प्रथा पडली आहे. नविन पिढीला या पासुन परावृत्त करण्यासाठी तालुक्यातील काही सामाजीक संस्थांनी पुढाकार घेतला असुन व्यसनमुक्त थर्टीफ़र्स्ट साजरा करण्याचा संकल्प घेतला आहे. या अंतर्गत ३१ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता दिलासा संस्थेच्या कार्यालयात कार्यशाळा घेण्यात येणार असुन दुपारी साडेचार वाजतापासुन घाटंजी शहरातून पथनाट्यासह जनजागरण रॅली काढण्यात येईल. गिलानी महाविद्यालयापासुन रॅलीला सुरूवात होईल. दरम्यान संपुर्ण शहरात या माध्यमातून जनजागरण करण्यात येईल.
अनेक युवक नवर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने मद्यपान करतात. त्यामुळे अनेकांना त्याचे व्यसन लागते. अनेक युवक दारू पिऊन या दिवशी शहरातील रस्त्यांवरून भरधाव वेगाने वाहने चालवितात. त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा प्रचंड त्रास होतो.
युवकांमध्ये याबाबत जाणिव निर्माण होऊन युवाशक्तीचा योग्य उपयोग व्हावा या उद्देशाने प्राऊटिस्ट ब्लॉक, दिलासा सामाजीक संस्था, विकासगंगा संस्था, स्वरजिवन संस्था, प्रियदर्शीनी संस्था, प्रदिप बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थांनी व्यसनमुक्त थर्टीफ़र्स्ट कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तालुक्यातील युवकांनी या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
No comments:
Post a Comment