Pages

Monday 8 December 2014

शिवसेनेच्या सत्तासहभागाचा घाटंजीत जल्लोष

शिवसेनेचा युती सरकार मध्ये सहभाग तसेच सेनेचे जिल्हा प्रमुख आमदार संजय राठोड यांची राज्यमंत्रीपदी निवड झाल्या बद्दल घाटंजी येथे शिवसेना व युवा सेनेच्या वतीने मिठाई वाटून व फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला.
येथिल चौकाचौकात ढोल ताशांच्या गजरात अनेक कार्यकत्र्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख विक्रम जयस्वाल, शिवसेना शहर प्रमुख मनोज ढगले, तालुका संघटक निलेश चव्हाण, गजानन पायघन, सतिश उदार, युवा सेना शहर प्रमुख सुरज विरदंडे, उपशहर प्रमुख हर्षल भोयर, मोहन ठाकरे, प्रशांत भुरे, प्रसाद डाकरे, निखिल बिलोणे, अजिंक्य रूईकर, अंकीत गायकवाड, पियुष आगळे, नागेश विरदंडे यांचेसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment